Deonar Cemetery Sakal
मुंबई

देवनार स्मशानभूमीत मृतदेहाची विटंबना?

पालिका अधिकाऱ्याचे मृताच्या नातेवाईकांकडे बोट

रशिद इनामदार

मानखुर्द - देवनार स्मशानभूमीमध्ये गुरुवारी (ता. ९) एका मृतदेहाला अग्नी दिला. चीता पेटली व थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चीता विझून मृतदेहाची विटंबना होण्याची भीती मृताच्या नातेवाईकांना वाटू लागली. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्या चितेवर पावसाचे पाणी पडून ती विझू नये यासाठी वरुन आच्छादन लावले. पालिकेच्या नियोजनशून्य गलथान कारभारामुळे मान्सून आला तरी शेडचे काम अर्धवट राहिल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. दुसरीकडे पालिकेचे अधिकारी मृताच्या कुटुंबीयांचा हट्ट यासाठी जबाबदार असल्याचे सांगत आहेत.

सहा दाहिन्यांपैकी चार वापरात आहेत तर दोन दाहिन्यांच्या वरील छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अग्निरोधक पत्रे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे अगोदरचे पत्रे काढण्यात आले आहेत. मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन येणाऱ्या कुटुंबीयांचा बऱ्याचदा अट्टाहास असतो की ज्या दाहिनीवर त्यांच्या कुटुंबातील अगोदरच्या मृत व्यक्तीचा अंत्यविधी झाला असेल तिथेच आणलेल्या मृतदेहाचा अंत्यविधी व्हावा. रात्री पण कुटुंबीयांना थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी कुणालाही न जुमानता छत नसलेल्या दाहीनीवर अंत्यविधी करण्यास सुरुवात केली. अग्नी दिल्यावर अनपेक्षितरीत्या पावसाला सुरुवात झाली.

- चेतन पेंडसे, कार्यकारी अभियंता (आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT