तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...  
मुंबई

तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 8) कौतुक केले. दरम्यान, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना अवमानकारक वागणूक देऊ नका; शिक्षा करताना कायद्याचे भान ठेवा, असेही न्यायालयाने पोलिसांना सुनावले. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी न्या. रोहित देव यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. नागरिक संदीप नायर यांनी ऍड्‌. अनिल कमले यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. पोलिस लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना अवमानकारक व क्रूर शिक्षा देत आहेत. त्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. 

उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली आणि अनुचित शिक्षा करण्याच्या प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली. पोलिस विभाग नेटाने आणि धीराने काम करत आहे; त्यांच्यावरील ताण समजण्यासारखा आहे; परंतु लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर कायद्याच्या कक्षेत बसणारी कारवाई करायला हवी. एखाद्याला हिणवणारी किंवा अवमान करणारी शिक्षा देता कामा नये. नागरिकांचे अधिकार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होता कामा नये, असे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले. 

फलक आणि छायाचित्रे 
नागपूर येथे काही पोलिसांनी सकाळी चालण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अशोभनीय आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी शिक्षा दिली होती. "याने कायदाभंग केला आहे. हा देशाचा, कुटुंबाचा आणि मानवतेचा शत्रू आहे' असे लिहिलेले फलक त्यांच्या हातात दिले होते. त्यांची छायाचित्रे काढून प्रसार माध्यमांत प्रसिद्ध केली होती. त्यामुळे संबंधित महिला आणि ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ झाले आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकाराचा तपशील दाखल करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुलामांचा व्यापार ही चूक! भारतासह ५६ देशांची माफी मागण्यास ब्रिटन तयार; पण नुकसान भरपाईला नकार

IND vs NZ 5th T20I: चौथ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज! शेवटच्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल, कोणाला मिळाली संधी?

Supreme Court: अयोध्येतील राम मंदिर त्याच जमिनीवर बांधले आहे का? सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका, उद्या महत्त्वाची सुनावणी

Uttarakhand Renewable Energy: नवीकरणीय ऊर्जेत उत्तराखंडची मोठी झेप; विशेष श्रेणीतील राज्यांमध्ये देशात दुसरा क्रमांक

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक: कराडमध्ये उदयसिंह उंडाळकर आणि धनाजी पाटलांचे शक्तिप्रदर्शन; मतदारांसह मतदान केंद्रावर हजेरी

SCROLL FOR NEXT