मुंबई

'जेएनपीटी' बंदराच्या खासगीकरणाविरोधात कामगारांचा एल्गार; काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शने

महेश भोईर

           
उरण - केंद्र सरकारने जेएनपीटीच्या मालकीचे एकमेव उरलेल्या जेएनपीसीटी बंदराचे  खासगीकरणा  संदर्भात  आज काळे झेंडे दाखवून  कामगार संघटनांनी खाजगीकरणाला कडाडून विरोध दर्शवून जेएनपिटी भवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी  प्रकल्पग्रस्तच्या पिकत्या शेतीवर हे पोर्ट वसले आहे त्या शेतीची काळी माती जेएनपिटीचे चेअरमन संजय सेठी यांना भेट केली आहे. 

जेएनपीटीच्या मालकीचे असलेले जेएपीसीटी हे एकमेव उरलेले बंदर आहे.येथील प्रकल्पग्रस्तच्या कवडी मोलाने जमिनी हस्तांतरीत करून त्यांच्या हे बंदर उभारण्यात आले आहे. येथील प्रकल्प ग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रश्न प्रलंबित असताना जेएनपिटी प्रशासनाने  पब्लिक, प्रायव्हेट,पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर खाजगीकरणाचा घाट घातला आहे.या खाजगीकरण विरोधात कामगार प्रकल्पग्रस्त  एकवटून अनेक वेळा मोर्चे निदर्शने जेएनपीटी प्रशाशन विरोधात करण्यात आली आहेत. 16 डिसेंम्बर ही मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या खाजगिकरना विरोधात मोठे रक्त रणजित आंदोलन उभे राहणार आहे.त्याचीच एक झलक म्हणून आज तिन्ही कामगार संघटना आणि प्रमुख कामगारांनि काळे झेंडे दाखवून कडाडून विरोध या खाजगीकरणाला केला आहे.

वेळीव संतप्त झालेले कामगार प्रतिनिधी  आणि कामगारांनी जोरदार  घोषणाबाजी करत निदर्शने केली.  जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जेएपिटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ,खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे संजय शेठी हटाव जेएनपीटी बचाव ,अशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आल्या या कामगारांच्या घोषणाबाजीने जेएनपीटी परिसर दुमदुमले होते.तिन्ही कामगार संघटनेचे प्रतिनिधी जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील,भूषण पाटील,आणि रवींद्र पाटील हे प्रतिनिधित्व करत होते. यावेळी कामगार प्रतिनिधी ट्रस्टी बोलताना म्हणाले 'जेएनपीटी कोणत्याही प्रकारे तोट्यात नाही आहे.जर असते तर जेएनपिटीने वाधवा पोर्ट .जालना ड्राय पोर्ट बांधले नसते अशा प्रकारे अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च जेएनपिटीने केला आहे.आम्ही कामगार काम करण्यास तयार कधीही तयार आहोत  कोविड मध्ये सर्वच बंद असताना जेएनपिटी सुरू होती आमचे कामगार जीवावर उदार होऊन हे काम करत होत.
विशेष म्हणजे खाजगीकरण न करता जेएनपीटी ने  अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवीली नविन क्रेन उपलब्ध केल्या  .बंदराची उत्पादन क्षमता ही वाढेल ही क्षमता  वाढविण्यासाठी सर्व कामगार जेएनपीटीला सर्वोतोपरी सहकार्य  करणार आहेत'.अशी भूमिका यांनी मांडली.

workers against privatization of JNPT port at uran

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT