मुंबई

शुद्ध मुंबई, शांत मुंबई ! मुंबईकरांनो आता घ्या मोकळा श्वास, कारण...

पूजा विचारे

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणाच्या मोठी सुधारणा झाल्याचं समोर आलं आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं मुंबई महापालिका यंत्रणेकडे उपलब्ध नोंदींच्या आधारे जानेवारी ते मे महिन्यातील हवा प्रदूषण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार मे महिन्यात मार्च आणि एप्रिलपेक्षाही प्रदूषण पातळीत मोठी घट झाली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्योगजगताने पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्याचं आवाहन या अहवालात केलं आहे.

महापालिकेनं हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या पीएम 2.5, पीएम 10, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड यांची पातळी मोजली. वायू वैविध्य सर्वेक्षण आणि संशोधन प्रयोगशाळेच्या माध्यमातून तसेच सफर-मुंबई या प्रदूषण मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून ही निरीक्षणे नोंदवण्यात आलीत. वायू सर्वेक्षण प्रयोगशाळेच्या अखत्यारीत तीन ठिकाणी वायू सर्वेक्षण केंद्र असून, चार वाहन आधारित (मोबाइल व्हॅन) सर्वेक्षण केंद्र आहेत. तसंच सफरची नऊ स्वयंचलित हवेची गुणवत्ता मोजणारी केंद्रे मुंबईत आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बीकेसी, अंधेरी, मालाड या भागात पीएम 10ची पातळी सर्वाधिक होती. बीकेसी भागात जानेवारीमध्ये ती 205 होती. मात्र मे महिन्यात या सगळ्याच ठिकाणी हा निर्देशांक 50हून कमी नोंदवला गेला आहे. बोरिवलीमध्ये मात्र मे महिन्याचा सरासरी निर्देशांक 68 आहे. 
 
ध्वनी प्रदूषणमध्येही घट 

लॉकडाऊनमुळं पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून आवाजाचा स्तर कमी नोंदविण्यात येत आहे. 

मार्च महिन्यात आवाजाची पातळी 52.6 डेसिबल नोंदविण्यात आली होती. एप्रिल महिन्यात आवाजाची पातळी 56.4 डेसिबल नोंदवली आहे. मे महिन्यात आवाजाची पातळी 52.9 एवढी आहे. वांद्रे आणि आसपासच्या परिसरातील आवाजाच्या पातळीची ही नोंद आहे. मात्र तरी देखील संपूर्ण मुंबईत ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमीच राहिलं असल्याची माहिती मिळतेय.

world environment day special air quality of mumbai improved trastically due to lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

SCROLL FOR NEXT