World Theatre Day 2023 Sudhir Mungantiwar artist drama mumbai
World Theatre Day 2023 Sudhir Mungantiwar artist drama mumbai sakal
मुंबई

World Theatre Day 2023 : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार; सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी, या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नातं असलेल्या सर्वांना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ना सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील 52 नाट्यगृहे सर्व सोयी सुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत दोन्ही बाजूचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.

यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध आहे ; नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का यावरदेखील विचार सुरू आहे. नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

राज्यातील नाट्य गृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत बैठकी घेऊन सविस्तर चर्चा केली. 52 पैकी रविंद्र नाट्य गृह सांकृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करुन नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन यासंदर्भातील तज्ञ व कलावंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

नाट्य चळवळ सुरू राहावी याकरिता राज्यातील नाट्यगृह आधुनिक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडीशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळया बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे.

कोरोना च्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावर देखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरिदेखिल मुंबईतील नाट्यगृहे जून 2023 पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली त्यादृष्टीने पुढाकार घेतला.

अल्प दरात हौशी कलावंतांना नाट्यगृह उपलबद्ध व्हावेत असाही माझा प्रयत्न असेल. नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांना मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT