MIHIR SHAH 
मुंबई

Worli Hit And Run Case: मिहीर लूक बदलून पलायनाच्या होता प्रयत्नात! कारमध्येच...; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

नेमकं त्याला काय करायचं होतं? जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहा हा लूक बदलून पलायलन करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली. मिहीरला काल विरार फाट्यावरुन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. (Worli Hit And Run Case Mihir Shah trying to escape by changing his look Shocking disclosure of Police)

सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, मिहीरनं केलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यासाठी लहान मोठ्या गोष्टी तपासायच्या आहेत. आरोपी हा पाळून गेल्यानंतर त्यानं आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. कारमध्येच त्यानं स्वतःची दाढी केली, केस कापले.

या घटनेच्या तपासासाठी महत्वाचे असलेले CCTV देखील आरोपी डॅमेज करू शकतात, त्यामुळं त्याला पोलीस कोठडी दिली पाहिजे. यात एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे मृत्यू झाला आहे, त्यामुळं अधिकच्या तपासासाठी मिहीर शहाला पोलीस कोठडी मिळाली पाहिजे, असंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

दरम्यान, मिहीर शहाच्या वकिलांनी म्हटलं की, जी कलमं त्याच्यावर लावण्यात आली आहेत त्यानुसार त्याला पोलीस कस्टडीची गरज नाही. एका दिवसाच्या कस्टडीमध्ये पोलिसांना सगळी माहिती मिळाली आहे. सगळे पुरावे पण मिळाले आहेत, आरोपी आता कोणताही पुरावा लपवू शकत नाही, त्यामुळं मिहीरला पोलीस कोठडीची गरज नाही असं मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT