Worli Hit And Run Case update in marathi esakal
मुंबई

Worli Hit And Run:"माझी बायको परत येणार का?" अपघातानंतर पतीने फोडला टाहो... वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत महिलेच्या पतीचा संताप

Worli Hit And Run Case update: वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिर शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राजेंद्रसिंग बिडावत आणि राजेश शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

Sandip Kapde

मुंबईच्या वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने एका दाम्पत्याला उडवले, ज्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाने रात्री मुंबईच्या व्हॉइस तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. तब्बल 18 हजार रुपयांची दारू पिल्यानंतर पहाटे वरळीच्या दिशेने जात असताना अपघात झाला.


प्रदीप नाकवा यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया दिली, "पोलिसांनी सांगितलं आहे की त्यांना कठोर शिक्षा देणार आहेत. पण माझी बायको परत येणार का? मोठ्या लोकांच्या बाजूने पूर्ण दुनिया आहे, पण गरीबांच्या मागे कोण आहे? त्यांच्या गाडीवर पक्षाचे स्टिकर होते जे खोडले. मी आणि माझी पत्नी 30 च्या स्पीडने गाडी चालवत होतो तेव्हा अचानक त्याने आम्हाला धडक दिली. आम्ही त्याला थांबायला सांगितले, मी पत्नीला खेचणार तेवढ्यात त्याने गाडी तिच्यावर चढवली. सी लिंक पर्यंत तिला फरफटत नेलं आणि पत्नीच्या अंगावर कपडे राहिले नव्हते. प्रवक्ते येऊन भाषण देतात, पण त्यांच्या घरातलं कुणी गेलं तर त्यांना कळेल."

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिर शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राजेंद्रसिंग बिडावत आणि राजेश शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी आणि त्यांची पत्नी वरळी कोळीवाडा येथे जात असताना बीएमडब्ल्यू ने मागून धडक दिली. घटनेचे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फिर्यादी यांच्या पत्नीला नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघातानंतर मिहिर शहाची गाडी बांद्रा कलानगर येथे सापडली आहे.

मिहिर शहा दहावी पास असून कन्स्ट्रक्शन व्यवसायात कार्यरत आहे. त्याची आई आणि बहिणी घराला ताळे ठोकून फरार झाल्या आहेत. पोलिसांनी मिहिर शहाचा शोध घेण्यासाठी  तपास सुरू केला आहे.

DCP कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले, वरळी कोळीवाड्यात एका BMW कारने मागून धडक दिल्यामुळे फिर्यादी आणि त्याची पत्नी जखमी झाले आहेत. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तात्काळ दाखल झाले. जखमी पत्नीला नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजऋषी बिडावत आणि राजेश शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, गाडी कोण चालवत होता याचा शोध घेतला जात आहे. संबंधित BMW गाडी बांद्रा कलानगर येथे सापडली असून, संशयितांनी पुढील प्रवास रिक्षाने केला असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT