Worli Hit And Run update esakal
मुंबई

Worli Hit And Run: आरोपी मिहीरच्या प्रेयसीची चौकशी, वडील अन् ड्रायव्हर ताब्यात... मुंबईच्या हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

Worli Hit And Run News: अपघाताला कारणीभूत असलेल्या कारचा विमा काढला नसून विम्याची मुदत संपल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीचे वडिल मिहीर शहा हा मुख्य आरोपी असून, वडील राजेश शहा हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत.

Sandip Kapde

पुणे पोर्शे अपघात ताजा असताना मुंबईतील वरळी भागात मोठा अपघात झाला. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हे हिट अँड रनचे प्रकरण घडले. वरळीच्या कोळीवाड्यात राहणारे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य मासे गोळा करण्यासाठी सैसून डॉकमध्ये गेले होते.

तेथून परतत असताना एका बीएमडब्ल्यू कारने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र उपचारादरम्यान कावेरीचा मृत्यू झाला. या प्रकरणा मुख्य आरोपी मिहिर शाहचे वडील राजेश शहा आणि चालक राजर्षी बिदावत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचे प्रकरण उघडकीस आले. वरळीच्या कोळीवाड्यात राहणारे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य मासे गोळा करण्यासाठी सैसून डॉकमध्ये गेले होते. तेथून परतत असताना एका बीएमडब्ल्यू कारने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. मात्र उपचारादरम्यान कावेरीचा मृत्यू झाला, तर प्रदीप गंभीर जखमी झाला.

पोलीस मिहीरच्या प्रेयसीची देखील चौकशी करत आहेत. अपघाताला कारणीभूत असलेल्या कारचा विमा काढला नसून विम्याची मुदत संपल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीचे वडिल मिहीर शहा हा मुख्य आरोपी असून, वडील राजेश शहा हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत.

मिहीर शाह हा कार चालवत होता. मिहीरच्या शेजारी आणखी एक व्यक्ती बसली होती, जो त्याचा ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर मिहिरने घटनास्थळावरुन पळ काढला. मिहीरचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT