रेवदंडा : आदित्य ठाकरे यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. या वेळी सचिन धर्माधिकारी, राहुल  धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (छायाचित्र : अभय आपटे )
रेवदंडा : आदित्य ठाकरे यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. या वेळी सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (छायाचित्र : अभय आपटे ) 
मुंबई

महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी यात्रा : आदित्‍य ठाकरे यांचा पुनरूच्‍चार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग  : साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करून रायगड जिल्ह्यात दाखल झालेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ ही आगामी निवडणुकांसाठी प्रचारयात्रा नाही, तर ही यात्रा नवीन महाराष्ट्र कसा असावा, यासाठी आहे. जनसामान्यांच्या विचारानुसार नवनिर्मितीसाठीही ही यात्रा आहे, असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले. 

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा येथे आशीर्वाद घेतल्यानंतर शिवसेनेची ‘जनआशीर्वाद यात्रा’ कुरूळ येथे दाखल झाली. क्षात्रैक्‍य समाज सभागृहात तिचे सभेमध्ये रूपांतर झाले. या वेळी त्यांनी शिवसेनेवर महाराष्ट्रातील मतदारांनी टाकलेली जबाबदारी सांभाळण्यास शिवसैनिक सक्षम असून संकटांना सामोरे जाण्यास ते तयार असल्याची ग्वाही दिली. 

सत्तेत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी वर्षाचे ३६५ दिवस काम करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मेहनतीने शिवसेनेचा डोलारा वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. या सभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे, सचिन अहिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, किशोर जैन, ज्येष्ठ नेते विजय कवळे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसैनिकांचा अलोट उत्साह
जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा सिंधुदुर्गातून सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी अलिबागमध्ये आगमन झाले होते. या यात्रेनिमित्ताने रायगडमधील शिवसैनिकांचा उत्साह अमाप वाढला होता. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. ही यात्रा थांबवून नागरिकांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या.

महेंद्र दळवी यांची चर्चा
अलिबागमधून युतीचा संभावित उमेदवार कोण असेल याबद्दल चर्चा सुरू आहे. जनआशीर्वाद यात्रेचे सभेत रूपांतर झाल्यानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांचा वावर पाहता अलिबाग विधानसभेसाठी त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरे येण्यापूर्वी त्यांचेही भाषण झाले.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत
विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे, ही भावना आजच्या सभेतून स्पष्टपणे दिसून येत होती. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले असले, तरी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करतच कार्यकर्त्यांनी त्यांचे सभास्थानी स्वागत केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT