file photo 
मुंबई

गरीब रुग्णांसाठी महापौरांचे दातृत्व! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महापालिकेची गाडी नाकारून महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवा पायंडा पाडला. आता गरीब दुर्बल घटकांतील रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी वर्षभराचे वेतन महापौर निधीसाठी जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. महापौरांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे.

मुंबईमधील गरीब आणि गरजू रुग्णांना मुंबईच्या महापौर निधीमधून आर्थिक मदत केली जाते. महापौर निधीमधून 2011 पासून प्रत्येक गरजू रुग्णाला 5 हजार रुपये इतकी मदत मिळत होती. 5 हजार रुपयांचा धनादेश अनेक रुग्णालयांकडून स्वीकारला जात नव्हता. गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या निधीत 20 हजारांची वाढ करण्यात आली आहे.

हृदय शस्त्रक्रिया तसेच किडनीरोपण या आजारांच्या रुग्णांना प्रत्येकी 25 हजार; तर डायलेसिसच्या रुग्णांकरिता 15 हजार रुपये मदत देण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौरपदी विराजमान होताच, महापौर निधीत वाढ करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी महापौरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मिळणारे एक वाहन नाकारले आहे. या गाडीवरील खर्च महापौर निधीमध्ये जमा करावा. महापौर निधीच्या मदत दात्यांना 50 ऐवजी 100 टक्के आयकरातून सवलत मिळावी, याकरिता पाठपुरावा सुरू केला आहे.

महापौर निधीसाठी लवकरच "महापौर रजनी' हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जांमुळे व गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांचे मानधन महापौर पेडणेकर यांनी नाकारले. तसेच जानेवारी ते डिसेंबर या पुढील वर्षाचे मानधनही महापौर निधीमध्ये जमा करावे, असे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले आहे. 

नगरसेवकांचेही मानधन 
सर्वपक्षीय नगरसेवक, अधिकारी- कर्मचारी, विविध संस्था, संघटनांकडून रुग्णांना मदत मिळविण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत; तर नगरसेवकांनी महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी द्यावे, असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे. बहुतांश नगरसेवकांनी मानधन निधीसाठी देण्यासाठी पत्र दिले आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT