Mumbai Crime  sakal
मुंबई

Mumbai Crime News : बंदुकीची मॅगझीन शोधण्यात यलोगेट पोलिसांना यश ; ३ संशयित ताब्यात !

Mumbai Crime News :

Chinmay Jagtap

Mumbai Crime News : मुंबईतील यलोगेट पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ऑरेंज प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या रायफलची मॅगझीन शनिवारी हरवली होती. त्याप्रकरणी २४ तासांत मॅगझीन हस्तगत करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

गौरेश वगळ, श्रेयस चुरिया, अभिषेक माणगावकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यलोगेट येथे सीआयएसएफ जवान नेहमीप्रमाणे शनिवारी कर्तव्यावर होता. त्या वेळी अचानक एक चारचाकी प्रवेशद्वारातून आत आली. कर्तव्यावरील सीआयएसएफ जवान गाडी थांबवत चालकाकडे चौकशी करू लागला. मात्र त्याच वेळी जवानाला धक्का देत अचानक वाहन वेगाने सीएसएमटीच्या दिशेने निघून गेले

त्या वेळी जवानाची रायफल गाडीच्या दरवाजावर आपटल्यामुळे रायफलच्या आतील मॅगझीन गाडीत पडली. गाडी निघून गेल्यानंतर गोळ्यांनी भरलेली मॅगझीन रायफलमध्ये नसल्याचे जवानाच्या लक्षात आले. गाडीत मॅगझीन पडल्याचा संशय आल्यानंतर वाहनाचा क्रमांक मिळवून सर्व प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात आले.

पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्ष व इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संबंधित गाडीचा शोध घेतला असता तीन संशयित गौरव वगळ, श्रेयस चुरी व अजित माणगावकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ३० जिवंत काडतुसे असलेली मॅगझीन त्यांच्याकडे सापडली. याप्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT