मुंबई : वीज कंपन्यांनी भरमसाठ बिले पाठविल्याने ग्राहक चिंतेत आहेत. सरकारकडून ग्राहकांना दिलासा मिळत नसल्याने ग्राहक चिंतेत आहेत. वीज कंपन्यांच्या कार्यालयात धावाधाव केल्यानंतरही दिलासा मिळत नसल्याने ग्राहकांना आणखी एका ठिकाणी दाद मागता येणार आहे. त्यानुसार तक्रारदार ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकणार आहेत. येथे ग्राहकांना मोफत दाद मागता येणार आहेत.
लॉकडाउनच्या कालावधीत वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठविण्यात आली. यामुळे ग्राहकांना दाद कुठे मागायची असा प्रश्न पडला आहे. ग्राहक वीज बिलामध्ये दिलासा मिळेल म्हणून वीज कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींचे निरसन होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली. परंतु हा निर्णय अद्यापही लालफितीमध्ये अडकला असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
ग्राहकांच्या वीज बिलाबाबत ग्राहकांची गाऱ्हाणी सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागता येते. परंतु याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने या मंचाकडे तक्रारी येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मंचाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर सुमारे 60 दिवसात यावर सुनावणी घेऊन ग्राहकांना न्याय देण्यात येतो. यासाठी वकिलाची मदतही घेता येते किंवा स्वतः अर्जदार आपली बाजू येथे मांडू शकते. हस्त लिखित अर्जही येथे ग्राह्य मानला जातो. उच्च न्यायालयानेही ग्राहकांना मंचाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ग्राहकांमध्ये मंचाबाबत जनजागृती नसल्याने ग्राहकांच्या खूप कमी तक्रारी येत असल्याचे मंचचे अध्यक्ष संतोषकुमार जयस्वाल यांनी सांगितले.
वीज बिलाबाबत कंपनीकडे दाद मागूनही समाधान न झाल्यास ग्राहकांना तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागण्याचा पर्याय असल्याचा आदेश वीज नियामक आयोगाने दिला आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या तक्रारींचे समाधान न झाल्यास मंचाकडे दाद मागता येणार आहे.
याठिकाणी करता येणार तक्रार
महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचचे 18 विभाग आहेत. येथे तक्रारदारांना झोननिहाय मंचाकडे तक्रार अर्ज करता येतात.
https://www.mahadiscom.in/mr/consumer-grievance-redressalapplication-forms-2/
बेस्टच्या ग्राहकांना इथे करता येईल तक्रार
तळमजला, बहुमजली अनेक्स बिल्डिंग, बेस्ट कुलाबा आगार, अकोमोडेशन मार्ग, कुलाबा.
दूरध्वनी क्रमांक - 022 22856262 विस्तार क्रमांक 258
मेल आयडी - decgrf@cgrfbest.org.in
decgrf@bestundertaking.com
--------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.