मुंबई

पोलिस खुन्याच्या शोधात त्या ठिकाणी गेले पण....

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : हत्या करून पळून गेलेल्या खुन्याचा शोध घेत असताना 20 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या तरुण ठाणे पोलिसांना सापडला. मोहम्मद अहमद उर्फ दिल्ली (33) असे या तरूणाचे नाव असून उत्तरप्रदेश राज्यातील एका गावातून 20 वर्षांपूर्वी त्याने घर सोडून धूम ठोकली होती. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकच्या हाती लागल्याने त्याला त्याच्या कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कळवा येथील औषध दुकानदाराच्या खूनाच्या प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या तपासात पोलिसांना आरोपी सापडला नाही मात्र, घरातून पळून गेलेला मोहमद हाती लागला. 

कळवा येथील औषधालयात काही दिवसांपूर्वी एका तरूणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एककडून सुरू आहे. यात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील संशयीत आरोपी माहिम दर्गाह भागात लपला असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, समीर अहिरराव यांच्या पथकाने आरोपीचा माहिम गाठले. मात्र, संशयीत त्याठिकाणी आढळला नाही. हा संशयीत वांद्रे उड्डाणपूलाखाली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वांद्रे उड्डाणपूलाकडे कूच करून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव मोहम्मद अहमद असल्याचे सांगितले. मात्र, या खूनामध्ये त्याचा कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. 

तरुण मुळचा उत्तर प्रदेशातील 
मोहम्मद हा भीक मागताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याची विचारणा केली. त्यावेळी त्याने20 वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश येथील सिक्री येथून घर सोडून पळून आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला घरी जाणार का, विचारल्यानंतर त्याने तात्काळ होकार दिला. त्यानंतर पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी 2000 साली तो हरविल्याची तक्रार उत्तरप्रदेश येथील जनतानगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून मुंबईतील गोवंडी भागात राहणाऱ्या मोहम्मदच्या भावाला कळवून त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT