मुंबई

तिने स्कायवॉकवरून मारली उडी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पूर्वेकडील कोपरी टीएमटी बसस्थानक येथील स्कायवॉकवरून तरुणीने उडी मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अंजली कश्‍यप (19, रा. विरार) असे तरुणीचे नाव असून तिने स्कायवॉकवरून का उडी मारली, याचा तपास कोपरी पोलिस करीत आहे. तिच्यावर कोपरीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विरार येथे राहणारी अंजली बुधवारी ठाण्यातील लोकमान्यनगर येथे राहणाऱ्या मावशीकडे आली होती. ठाण्यातील आर. जे. ठाकूर महाविद्यालयात तिची एमएससीआयटीची परीक्षा होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी जाते, असे सांगून निघालेल्या अंजलीने सायंकाळच्या सुमारास कोपरीतील स्कायवॉकवरून स्वतःला झोकून दिले.

उडी मारल्यानंतर पाठीवर पडल्याने तिच्या मणक्‍याला जबर मार लागला आहे. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून पोलिस नियंत्रण कक्षाला खबर दिली. अधिक तपास कोपरी पोलिस करीत आहेत.

web title : The young woman jumps from the skywalk

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापाचा वाद पोरावर राग! रिक्षातून ओढून धुणे धुतल्यासारखं ४ वर्षीय मुलाला मारहाण, मुंबईतील अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ...

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा मृत्यू; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Fridge Safety Tips : फ्रीजचा ब्लास्ट! उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 4 चुका; नाहीतर बॉम्बसारखा फुटेल रेफ्रिजरेटर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT