Corona Updates  sakal media
मुंबई

मुंबईत पुन्हा शून्य मृत्यू; नीचांकी रुग्णसंख्येची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत सलग नऊ दिवस शून्य मृत्यूची नोंद (Zero corona deaths) झाल्यानंतर काल एका मृत्यूची भर पडली. त्यानंतर आज पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे, तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (corona patients) आणखी कमी झाली असून आज केवळ ३८ बाधित रुग्णांची नोंद झाली. कोविड काळातील ही नीचांकी नोंद आहे. दैनंदिन कोविड चाचण्यांची संख्या (corona active patients) ही कमी झाली असून आज दिवसभरात केवळ ८,१९३ कोविड चाचण्या करण्यात आल्या.

आज दिवसभरात ३८ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १० लाख ५६ हजार ९५६ वर पोहोचली आहे. तसेच आज ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ३६ हजार ८९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ६ हजार ८१५ दिवस झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा साप्ताहिक दरदेखील ०.०१ पर्यंत खाली आला आहे. आज शून्य कोविडबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा १६ हजार ६९२ वर स्थिर आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: “जरांगेनीच माझ्यावर हल्ल्यासाठी सुपारी दिली”; अमोल खुणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “आता सुट्टी देणार नाही”

Nalasopara: लग्नाचे आमिष दाखवून हिंदू तरुणीवर वारंवार अत्याचार, ७०-८० तरुणींना फसवलं; अश्लील व्हिडिओ अन् फोटो काढत...

समोर समुद्र, मोठाला वऱ्हांडा... जिम ट्रेनरने दाखवलं कसं होतं नाना पाटेकरांचं गोव्यातलं घर; ती जागाही जिथे...

Navratri Day Three: आज नवरात्रीची तिसरी माळ! करा देवी चंद्रघंटेची पूजा; जाणून घ्या कथा, पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला ICC चा मोठा पुरस्कार, विश्वविक्रमही झाला; शफाली वर्माचाही सन्मान

SCROLL FOR NEXT