Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी

कल्याण परिमंडलात एकाच दिवसात 1 हजार 369 कनेक्शन

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : महावितरणचा वर्धापन दिनानिमित्त नवीन वीज जोडणीची झिरो पेन्डन्सी हा उपक्रम कल्याण परिमंडळात राबविण्यात आला. यावेळी कल्याण परिमंडलात सर्व पात्र अर्जांवर कार्यवाही करून बुधवारी एकाच दिवसात तातडीने 1 हजार 369 नवीन वीजजोडण्या देत ‘झिरो पेन्डन्सी’चे लक्ष्य साध्य करण्यात आले.

महावितरणचा वर्धापन दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नवीन वीजजोडणीचा एकही अर्ज प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत. कल्याण परिमंडलात एकूण 1 हजार 232 सिंगल फेज तर थ्री-फेजच्या 137 वीज जोडण्या बुधवारी एकाच दिवशी कार्यान्वित करण्यात आल्या. यात कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली विभागात सिंगल फेजच्या 278 आणि थ्री फेजच्या 57 वीजजोडण्या देण्यात आल्या.

कल्याण मंडल कार्यालय दोनमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर भागात सिंगल फेजच्या 332 आणि थ्री फेजच्या 35 वीजजोडण्या देण्यात आल्या. वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे परिसरात सिंगल फेजच्या सर्वाधिक 410 आणि थ्री फेजच्या 24 वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. तर पालघर मंडल कार्यालयातील पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरात सिंगल फेजच्या 212 आणि थ्री फेजच्या 2 वीजजोडण्या देण्यात आल्या. या कामगिरीबद्दल मुख्य अभियंता औंढेकर यांनी अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

Parbhani News: शेणखताची ट्रॉली झाली साडेतीन हजाराला!; पशुधन घटल्याने दरात वाढ; खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Latest Marathi News Live Update : १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विदर्भात तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT