Drugs seized  Sakal Digital
मुंबई

कॅन्सरवरील उपचाराच्या मोबदल्यात ड्रग्ज तस्करी, महिलेच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी झिंबाब्वेच्या महिलेला अटक करण्यात आली. ती मुंबईत कॅन्सवर उपचार घेण्यासाठी मेडीकल व्हिसावर आली होती. तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोईन आणि १४०० ग्रॅम मेथॅम्प (Drugs Smuggling Mumbai) जप्त करण्यात आले. याची किंमत तब्बल ६० कोटी रुपये आहे. एअर इंटलिजन्स ब्युरोने (AIU) ही कारवाई केली आहे.

रोझी डायमंड असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ती कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी मुंबईत आली आहे. ड्रग्सची तस्करी करणाऱ्या मास्टरमाईंडने मला ड्रग्स भारतात नेण्याची विनंती केली. मी मुंबईत ड्रग्स आणले तर तो माझ्या उपचाराचा सर्व खर्च करणार होता, असं त्यानं मला सांगितलं. त्यामुळे मी माझ्या बॅगमध्ये लपवून ड्रग्स मुंबईत आणलं, असं तिने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. यापूर्वीही तिने ड्रग्सची तस्करी केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

झिंबाब्वे येथील हरारे येथून एक महिला ड्रग्स घेऊन येत असल्याची गुप्त माहिती एअर इंटलिजन्सला मिळाली होती. त्यानंतर विमान मुंबईत येताच त्यांनी या महिलेची बॅग तपासली. बॅगच्या खालच्या बाजूला ड्रग्स आढळून आले. त्यानंतर कस्टम विभागाला माहिती देऊन ड्रग्स जप्त करण्यात आले. या महिलेला NDPS कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजार केले असता सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या वर्षी देखील एअर इंटलिजन्सने झिम्बॉवेच्या दोन नागरिकांना ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक केली होती. यावेळी त्यांच्याकडून २४० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT