Girl-health 
myfa

Video : लाइफस्टाइल कोच : आरोग्य टीन एजर्स मुलींचे ...

डॉ. मनीषा बंदिष्टी

कुटुंबाच्या आरोग्यात महिलेचे आरोग्यही खूप महत्त्वाचे असते. स्त्रीचा आनंद प्रामुख्याने आरोग्यावर अवलंबून असतो. दुर्दैवाने आरोग्य म्हणजे केवळ ‘परफेक्ट फिगर’ असा समज महिलांमध्ये दिसतो. विशेषतः टीन एजर्स मुलींमध्ये तो सामान्यच. तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. एका १५ वर्षीय मुलीची आई माझ्या क्लिनिकमध्ये मुलीसाठी वजन घटविण्याचा सल्ला मागण्यास आली. मुलीला तपासल्यानंतर तिची रक्तचाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यावर ती म्हणाली, ‘‘तिच्या रक्तामध्ये काही दोष असेल, असे मला वाटत नाही. तिला फक्त वजन कसे कमी करायचे ते सांगा.’

प्रत्येकालाच मला असे सांगायचेय की, तुम्ही कधी स्वतःच्या शरीरामध्ये डोकावलात का? केवळ बाह्यरूप आणि वरवरच्या आकाराच्या पलीकडे खूप काही असते. ती म्हणजे, तुमची वैद्यकीय सुस्थिती. कोणत्याही मुलीसाठी १२ ते २२ हे वय भावी आयुष्याचा पाया असतो. या काळात तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे या वयात वैद्यकीय सुस्थिती अधिक महत्त्वाची असते. ती आतूनच तंदुरुस्त असल्यास पौगंडावस्थेसह आयुष्यातील गर्भारपण, प्रसूतीसारख्या विविध टप्प्यांनाही तोंड देऊ शकते. मुलीच्या रक्तचाचण्या का करायला हव्यात, याचे हेच कारण होय. उदा. हिमोग्लोबिन, लोह, रक्तक्षय तपासण्यासाठी ब-१२, ड-३ जीवनसत्त्व, हाडांमधील कॅल्शियमची चाचणी आदी विविध घटकांबद्दल रक्तचाचणीतून समजू शकते. थायरॉइडची चाचणीही करायला हवी.

टीन एजर्स मुलींमधील सामान्य समस्या...
रक्तक्षय

खालील लक्षणे तपासा

  • तीव्र अशक्तपणा जाणवणे
  • डोळे, जीभ, नखे निस्तेज पडणे
  • छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे
  • भूक कमी-जास्त होणे
  • वारंवार तोंड येणे
  • लक्ष एकाग्र करता न येणे

वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास मुलीला डॉक्टरकडे घेऊन जा. योग्य निदानासाठी रक्ताची चाचणी करा. तिच्या रक्तात लोहच्या कमतरतेचा रक्तक्षय किंवा ब-१२ जीवनसत्त्वाचीही कमतरता असू शकते.

  • योग्य उपचार घ्या
  • निर्जंतुकीकरण करा

वैद्यकीय स्थितीनुसार आहारात योग्य ते बदल करा. दैनंदिन आहारात लोह, ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, ‘ब-१२’ जीवनसत्त्वयुक्त तसेच प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

पीसीओएस किंवा पीसीओडी
आजच्या पिढीत पीसीओएस सामान्य आजार बनलाय. त्यामुळे संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होते. यामागची प्रमुख कारणे अशी...

  • चुकीची जीवनशैली
  • रात्री उशिरापर्यंत स्मार्ट फोनवर जागरण करणे, कमी आणि विस्कळित झोप
  • जेवणाच्या अनियमित वेळा, जंकफूड, तळलेल्या पदार्थांचे, शीतपेयांचे सेवन
  • बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव 

सामान्य लक्षणे

  • वजन कमी होणे
  • मासिक पाळी विस्कळित होणे
  • चेहरा, छातीवर अनावश्यक केसांची वाढ
  • तेलकट त्वचा किंवा चेहऱ्यावरील मुरुमे
  • सतत चिडचिड होणे

पीसीओएसमुळे रक्तदाब, इन्शुलिनच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. रक्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय हायपोथायरॉडिझमशीही त्याचा संबंध असू शकतो. यातून गर्भ राहण्यातही अडचणी येऊ शकतात. वरील लक्षणे असणाऱ्या कोणत्याही मुलीने तज्ज्ञांकडून तपासणी करायला हवी. योग्य पावले उचलावीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT