sakal
myfa

हेल्दी फूड : फायदे लो-कार्ब डाएटचे

आरोग्याशी संबंधित रक्तातील ट्रायग्लिसराईड्स, आरोग्यासाठी चांगले एजडीएल कोलेस्टरॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब आदी गोष्टींमध्ये सुधारणा दिसून येते.

शौमा मेनन

मित्रांनो, लो-कार्ब डाएट गेली अनेक दशके लोकांमध्ये चर्चेत आहे. लो-कार्ब डाएटमुळे वजनातील घट लो-फॅट डाएटच्या तुलनेत अधिक वेगाने साधता येते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित रक्तातील ट्रायग्लिसराईड्स, आरोग्यासाठी चांगले एजडीएल कोलेस्टरॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब आदी गोष्टींमध्ये सुधारणा दिसून येते.

तसे पाहिल्यास लो-कार्ब डाएटची निश्चित अशी व्याख्या नाही. त्याचा संदर्भ केवळ लो-कार्ब किंवा कार्ब नियंत्रित डाएटशी आहे. यामध्ये खाण्याची पद्धत टिपिकल पाश्चिमात्य डाएटचा विचार करता अत्यंत कमी प्रमाणात कार्ब व अधिक प्रमाणात प्रथिने अशा प्रकारची असते. त्यामध्ये मांस, मासे, अंडी, सुकमेवा, विविध बिया, भाज्या, फळे आणि उपयुक्त फॅट्स या गोष्टींवर भर दिलेला असतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आहारातील विविध धान्ये, बटाटा, साखरयुक्त पेये व साखरेचे अधिक प्रमाण असलेले जंक फूड टाळणे अपेक्षित आहे.

केटोजेनिक डाएट

केटोजेनिक डाएट हा अत्यंत कमी प्रमाणात कार्ब व अधिक प्रमाणात फॅट असलेला डाएट आहे. केटो डाएटचे ध्येय कार्बचे प्रमाण इतके कमी ठेवण्याचा असते, की तुमचे शरीर केटोसिस नावाच्या चयापचयाच्या स्थितीमध्ये जाते. या स्थितीमध्ये तुमच्या शरीरातील इन्शुलिनची पातळी वेगाने कमी होते आणि तुमचे शरीर शरीरातील फॅट्सच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड्स बाहेर टाकण्यास सुरुवात करते. यातील बहुतांश फॅटी अॅसिड्स यकृताकडे नेली जातात व तेथे ते किटोन्समध्ये परावर्तित होतात.

किटोन्स पाण्यात विरघळणारे रेणू आहेत व ते मेंदूला ऊर्जेचा पुरवठा करतात. त्यामुळे तुमचा मेंदू कार्बच्या ऊर्जेवर चालण्याऐवजी किटोन्सवर अवलंबून राहू लागतो. तुमच्या मेंदूला आवश्यक असलेले थोड्या प्रमाणातील ग्लुकोज शरीर ग्लुकोनिओजेनेसिस (gluconeogenesis) या प्रक्रियेतून तयार करते. अशाप्रकारे केटोजेनिक डाएटमध्ये अधिक प्रमाणात प्रथिने व फॅट असलेल्या अन्नाचा समावेश होतो. कार्बची शरीराला असलेली आवश्यकता दिवसाला ५० ग्रॅम व काही वेळा अगदी २० ते ३० ग्रॅमच असते.

लो-कार्ब, हाय फॅट (एलसी-एचएफ)

एलसी-एचएफचा भर मुख्यतः मांस, मासे, अंडी, फॅट्स, भाज्या, डेअरी उत्पादने, नट्स आणि बेरीवर असतो. या डाएटमध्ये कार्बचे प्रमाण दिवसाला २० ते १०० ग्रॅम असणे अपेक्षित असते.

लो-कार्ब पॅलिओ डाएट

पॅलिओ डाएट हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध डाएट आहे. यामध्ये पॅलिओलिथिक काळ, म्हणजेच शेती आणि औद्योगिक क्रांती होण्याच्या आधीच्या काळातील अन्नाचे ग्रहण करणे असा होतो. तुम्ही लो-कार्ब डाएट स्वीकारणार असाल, तर ते तुमच्या जीवनशैलीला, खाण्याच्या प्राधान्यांना आणि वैयक्तिक आरोग्यांच्या ध्येयांशी सुसंगत असेच निवडा. एखाद्या व्यक्तीसाठी ते योग्य ठरल्यास दुसऱ्यासाठीही ठरेलच, असे नाही. जे तुम्ही पाळू शकता, तेच तुमच्यासाठी योग्य डाएट आहे हे लक्षा ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT