sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation 
myfa

इनर इंजिनिअरिंग : इच्छांचे काय करावे... 

सद्गुरु, ईशा फाउंडेशन

अलीकडेच एका अग्रगण्य तमिळ मासिकात लेखांच्या या मालिकेबद्दल मला विचारले. शीर्षक होते ‘अथनेकूम आसईपडू’ अर्थात ‘सृष्टीतील सर्वच्या सर्व गोष्टींची इच्छा करा.’ यामुळे लोकांमध्ये खूप चर्चा, विवाद आणि गोंधळ उडून गेला. पत्रकार मला विचारत होते, ‘इतर सर्व स्वामी आम्हाला इच्छा सोडून द्यायला सांगतात, मात्र तुम्ही सर्व गोष्टींची इच्छा करायला सांगता. याने आपण देवाकडे पोचू का?’’ तुम्हाला तुमची इच्छा सोडून द्यायची आहे. ही सुद्धा एक इच्छा नाहीये का? किंवा तुम्ही म्हटले, ‘मला देवाला प्राप्त करून घ्यायचे आहे,’ ही सुद्धा एक खूप लोभी इच्छा नाहीये का? एखाद्याला सृष्टीतील फक्त एका छोटाश्या तुकड्याची इच्छा असल्यास तुम्ही त्याला लोभ म्हणाल. एखाद्याला अगदी सृष्टीकर्ताच हवा असल्यास हा महाप्रचंड लोभ नाहीये का? 

तुम्ही तुमच्या इच्छांचा त्याग करण्याबद्दल बोलत असता. तुम्ही इच्छा सोडून देण्याची इच्छा निर्माण केल्यास तुम्ही अद्यापही इच्छेतच अडकले आहात. ही ‘शक्य नाही’ अशी शिकवण आहे. हा निव्वळ मूर्खपणा लोकांना विकण्यात आला आहे. ते फक्त ग्रंथामध्ये छापले गेले म्हणून किंवा कोणी त्याला पवित्र म्हणते म्हणून, ते सत्य होत नाही. तुम्ही ज्याला जीवन म्हणून संबोधता, ती ऊर्जा आणि ज्याला तुम्ही इच्छा असे म्हणता ती ऊर्जा; या दोन्ही भिन्न गोष्टी नाहीत. इच्छा नसणे म्हणजे जीवनासाठी कोणतीही शक्यता नसणे. तर मग तुमच्या इच्छांचे काय करावे? फक्त आयुष्यातील सर्वोच्च गोष्टीची इच्छा करा आणि तुमची सर्व इच्छाशक्ती त्या परमोच्च गोष्टीच्या दिशेने प्रवाहित करा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या विरक्तीच्या आणि निष्कामतेच्या शिकवणुकी येण्याचे कारण गुंतून, अडकून पडण्याच्या भीतीमुळे आहे. कारण बहुतेक लोक काही ना काही गोष्टींमध्ये गुंतून अडकून पडलेले दिसतात. एखाद्या व्यक्तीमध्ये हे जंजाळ नेहमीच वेदना आणि पीडा निर्माण करते आणि कोणीतरी उपाय दिला : ‘अलिप्त राहा’, ‘विरक्त व्हा’. तुम्हाला जीवन टाळायचे असल्यास मरण्यावाचून पर्याय नाही. तुम्हाला जगायचे असल्यास तुम्हाला समरसता आणि सहभागाची गरज आहे. जीवनाच्या प्रक्रियेचा आनंद घेणे किंवा जीवनाच्या प्रक्रियेचा आनंद न घेण्याची मूलभूत तत्त्वे - ज्याला तुम्ही स्वर्ग आणि नरक असे म्हणता; याची मूलभूत तत्त्वे अशी आहेत : जे काही तुम्ही स्वेच्छेने करता, तो तुमचा स्वर्ग आहे. 

तुम्ही एखाद्या गोष्टीत अनिच्छेने गुंतला असल्यास तो नरक आहे. एखादी सर्वांत सुंदर गोष्ट तुमच्याबरोबर बळजबरीने घडली असल्यास ती सर्वांत कुरूप गोष्ट होऊ शकते. ज्या क्षणी तुम्ही म्हणता, ‘मला अलिप्त व्हायचे आहे,’ त्याक्षणी तुम्ही जीवनाच्या प्रक्रियेसाठी अनिच्छुक बनता, तुम्ही तुमच्या आयुष्याला नरकात बदलता. ज्यांनी त्यांचे आयुष्य नरक बनवले आहे, ते जगालाही नरक बनवतील. जे आनंदी आहेत, ते जगात आनंद पसरवतील. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT