तुमच्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय?
वेलनेस म्हणजे ‘शारीरिक’ आणि ‘मानसिक’ आरोग्याचं योग्य संतुलन ठेवणं होय. वेलनेस कोरोनामुळं निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या युगात सर्वांत मौल्यवान ठेवा ठरला आहे.
आरोग्य उत्तम राखण्यासाठीचा तुमचा मंत्र काय?
मी दररोज २ तास ‘जीम’ करतो, ज्यानं माझं शरीर एकदम ‘फिट’ राहण्यास मला मदत होते. त्यानंतर दररोज देवपूजा करताना मंत्रोच्चार करतो, ज्यानं माझं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यास मदत होते. मला कोणतेही व्यसन नाही. त्यामुळं आरोग्य उत्तम राहण्यास खूप फायदा होतो. मी जीममध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डियो करतो. त्याचबरोबर सतत संगीत ऐकत असतो. तसंच टीव्हीवर प्राण्यांचं विश्व बघताना मानसिक ताण खूप हलका होतो. घरी आमचा कुत्रा ‘मोजो’शी खेळून ताण हलका होतो.
आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?
शारीरिक ‘फिटनेस’च्या बाबतीत आजकाल अनेक जण जागरूक आहेत, पण मानसिक ‘फिटनेस’कडं तेवढ्या गांभीर्याने पाहिलं जात नाही. खरंतर मानसिक स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे; कारण ‘मेंटल स्ट्रेस’मुळंच आपल्याला मधुमेह, रक्तदाबासारखे आजार जडतात. घरगुती जेवण घ्यावं. बाहेरचं कमी खावं. शरीराला जेवढी आवश्यक झोप आहे, ती मिळालीच पाहिजे. मी सिनेमा आणि संगीत क्षेत्रांत काम करतो. आमचं वेळापत्रक दररोज बदलत असतं. अशावेळी शरीराचं ‘रूटीन’ कायम बिघडलेलं असतं. अशावेळी फिटनेसचा खूप फायदा होतो आणि मानसिक आणि शारिरिक ताण कमी होतो.
मानसिक आरोग्यासाठी काय करता?
मी ‘सिद्ध समाधी योग’चा कोर्स केला आहे. त्यामुळं ध्यान, प्राणायाम शिकलो आहे. ज्याचा मला मानसिक आणि शारिरिक आरोग्यासाठी खूप फायदा होतो.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मानसिक आरोग्य तुमच्या ‘विचारसरणी’वर अवलंबून असतं, तसेच तुम्ही कुठल्या लोकांबरोबर वावरता, तुमचं मित्र कुठल्या आचरणाचे आहेत, यावरही अवलंबून असतं. ‘स्व-प्रेरणा’ अत्यंत गरजेची असते.
उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली काय?
उत्तम आहार, शारीरिक आणि मानसिक व्यायाम, मित्र आणि परिवाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं, अध्यात्माशी जोड ठेवणं, तसंच नियमितपणे ध्यान करणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.