myfa

चेतना तरंग : स्वत:पासून सुधारणा हवी... 

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

प्रश्न : मला एक मुलगा असून माझी पत्नीशी घटस्फोट घेण्याची इच्छा आहे. तुम्ही काय मार्गदर्शन कराल, 
उत्तर : सर्वप्रथम, तुम्ही स्वत:ला हा प्रश्न विचारा की तुम्ही या नात्यामध्ये आपले १०० टक्के दिले आहेत का, तुमच्या मनाने आपण ८० टक्के दिले आहेत किंवा अगदी ९५ टक्के दिले, असे उत्तर दिले तरी १०० टक्के योगदान देईपर्यंत वाट पाहा. तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमचे १०१ टक्के देणे अधिक चांगले ठरेल. मुलांसाठी केलेले हे छोटे बलिदान तुम्हाला दीर्घकालिन फायदा देईल. मात्र, तुम्ही पत्नीबरोबरच्या नात्यामध्ये १०० टक्के योगदान दिल्यावरही त्याचा फारसा उपयोग झाला नाही, तर तुमच्या जोडीदाराला मित्रत्वाच्या भाषेत सांगा की आपले मार्ग वेगवेगळे आहेत. आपण एकमेकांपासून वेगळे होणे अधिक श्रेयस्कर असेल. 

प्रश्न : गुरूदेवजी, मी काहीवेळा उत्साही आणि अतिशय आत्मविश्वासू असतो. मात्र, माझ्या दोन समस्या आहेत. 
१. मला गोष्टींचे विस्मरण होते. 
२. हीच अवस्था कायम राहिल्यास पुढे काय होईल, याची भीती वाटते. हे प्रामुख्याने माझ्या पत्नीबाबत होते. मी काय करायला हवे

उत्तर : मला एक प्रसंग आठवतो, एक सद्‌गृहस्थ आपल्या पत्नीबरोबर आमच्या एका कोर्समध्ये सहभागी झाले होते. कोर्सदरम्यान ज्ञान दिले जात असताना तो आपल्या पत्नीला हे सांगत होता की, आपण खूप काळापासून याच गोष्टी तिला सांगतोय. त्यानंतर मी नात्यामध्ये विसरणे आणि क्षमा करण्याचे महत्त्व सांगितले तेव्हा पत्नीनेही त्याला हेच सांगितले की, तीही त्याला खूप दिवसांपासून हेच सांगतेय. यावर एकच हशा पिकला. मी त्या गृहस्थाला म्हणालो की, माझे मुद्दे हे स्वत:ला लागू करण्यासाठी आहेत, केवळ दुसऱ्याला सांगण्याकरिता नाही. अशा कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. आम्ही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा कधीही करत नाही. आम्ही थेट काम सुरू करतो आणि आवश्यक गोष्टी आम्हाला उपलब्ध होतात. ही ‘सिद्धी’ किंवा ‘परफेक्शन’ आहे. ज्या गोष्टींची गरज असते, त्या त्यावेळी उपलब्ध होतात. येथे ध्यान आणि प्राणायामाचे उदाहरण घेता येईल. याच्या सरावामुळे तुम्हाला कशाचाही अभाव जाणवत नाही. आपण कशाचीही कमतरता नसल्याच्या या भावनेपर्यंत पोचण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT