योगा लाइफस्टाइल : योगा आणि समाधान
योगा लाइफस्टाइल : योगा आणि समाधान sakal news
myfa

योगा लाइफस्टाइल : योगा आणि समाधान

वसुंधरा तलवारे

‘जीवनात असे काही घडले की मी आनंदी असतो,’ असे तुम्ही किती वेळा म्हणता? अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण आनंदी होण्यासाठी उद्या चांगले काहीतरी घडेल याची वाट पाहत असतो. योगाच्या मार्गावर चालण्यासाठीच्या पाच नियमांपैकी एक असलेल्या ‘संतोष’बद्दल महर्षी पतंजली यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

‘संतोषादनुत्तमसुखलाभः’ आपल्यापैकी किती जण खरोखरच स्वतःकडे असलेल्या आणि असलेल्यांपैकी सर्व गोष्टींसह संतुष्ट आहोत, असा ठामपणे दावा करू शकतात. महर्षी पतंजली यांच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक सुख आणि आनंद समाधानातूनच मिळत असतो. चित्त आणि शरीरस्वास्थ्यासाठी आपण चटईवर शांतपणे बसून राहतो, त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि शांती निर्माण होण्यासाठी समाधानाचाही सराव करावा लागतो. मी लहानपणी जशी दिसत होते, त्याबद्दल कायमच असमाधानी होते. मी नेहमी माझ्या मांड्या आणि स्तनांच्या आकाराबद्दल तक्रार करत असे. एकाचा आकार खूप मोठा तर दुसऱ्याचा आकार लहान, अशी माझी तक्रार असे. आयुष्यातील बराच वेळ मी माझ्या शरीरावर टीका करण्यातच घालविला. त्याचबरोबर सुडौल बांधा येण्यासाठी खूप मेहनत घेतली. माझ्या दृष्टीने स्वतःसाठी केलेली ती हिंसाच होती. मी कमी जेवायचे, खूप भूक लागायचा त्रासही मी सहन केला. माझे कधी कोणी कौतुकही केले नाही. शारीरिक ठेवणीबाबत मी कायम असमाधानी असायचे.

स्वतःला समजून घेण्याच्या दिशेने मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यासाठी संतुष्टतेच्या सूत्राचा अवलंब केला. खरोखर सांगते, त्या दरम्यान आजपर्यंतच्या आयुष्यातील मी तारुण्याचा आणि परिपूर्ण दिसत असल्याची अनुभूती घेतली. आंतरिक समाधान आणि चमक आतून निर्माण होत असल्याचे जाणवले. ती समाधानाची शक्ती आहे. त्यामुळेच तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक समाधानी राहू शकता. परिणामी अधिक सुख पदरी पडते. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबाबत असमाधानी असल्यास अधिक दुःखी होत असतो. हे चमत्कारिक परंतु गमतीशीर आहे.

महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे, समाधानी असणे म्हणजे अपेक्षित ध्येयप्राप्तीचे काम थांबविणे असे नाही. आपल्याकडे असलेल्या गुणांचे कौतुक करून ते स्वीकारत पुढे वाटचाल करणे असा त्याचा अर्थ आहे. जीवनात उच्चतम ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याबद्दलच्या उद्दिष्टाची स्पष्टता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वसाधारण आढळणारी बाब म्हणजे, आपल्याकडील चांगली गोष्ट कायम जपून ठेवत असतो.

उदा : चांगले कपडे खास कार्यक्रमासाठी बाजूला ठेवतो किंवा भोजनात आवडता पदार्थ शेवटी ठेवतो. आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी कधीच पूर्णपणे अनुभवलेल्या नसतात. त्यामुळे आपल्यामध्ये समाधानाची भावना कधीच नसते. आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा आनंद घेण्यास सुरुवात कराल, त्या क्षणापासून समाधानासाठी तुम्हाला दुसऱ्यांची आवश्यकता भासणार नाही. कपड्यांच्या नावडत्या २० जोड्यांपैकी दोनच जोड्या पुरेशा आहेत, याची खात्री पटते त्यावेळी आपण सर्वाधिक आनंदी असतो.

परिपूर्ण जीवन किंवा परिपूर्ण व्यक्ती अशी कोणतीही संकल्पना नाही. जीवनात आपल्याला काही द्यावे लागणे यातच समाधान मानले पाहिजे आणि रोजच्या जगण्याचाही तोच दृष्टिकोन असला पाहिजे. यासाठी स्पष्टता आवश्यक आहे. योगाकडून आपण हेच शिकतो. ते चांगलेच आहे ना...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT