Nagpur Crime 
Nagpur_old

Nagpur Crime: तरुणीला भेटण्यासाठी बोलावून दोन नराधमांचा सामूहिक अत्याचार; आरोपींना न्यायालयीन कोठडी

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime

मानोरा: तालुक्यातील एका गावातील २२ वर्षाच्या युवतीवर माहुली शेत शिवारात तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मानोरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानोरा तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती मानोरा येथे एका दुकानात सिमेंट व टिन पत्रे घेण्यासाठी वडीलांसोबत आली होती. त्यावेळी या दुकानावर मिथुन जनार्दन राठोड (वय २४ वर्षे) हा काम करायचा.

त्याच्या सोबत पिडीतेची ओळख झाली होती. या ओळखीतून तो पीडितेला नेहमी फोन करायचा. घटनेच्या दिवशी १६ जून रोजी मिथुन राठोड याने पीडितेला भेटण्यास बोलाविले होते.

पीडित मिथुन राठोड याला भेटण्यासाठी गावावरून दोन की.मी. अंतरावर आली असता मिथुन राठोड आपला मित्र नितीन दयाराम पवार सोबत सदर युवतीला भेटण्यासाठी आला.

मात्र, मिथुन राठोड याला मानोरा येथील दुकानावरून फोन आल्याने त्याने आपला मित्र नितीन पवार याला सदर युवतीला घरी नेऊन सोडण्यास सांगून तो मानोरा येथे परत गेला. नितीन पवार याने सदर युवतीला दुचाकीवर बसवून घरी नेण्याच्या बहाण्याने माहुली शिवारात आणले.

तिथे युवतीवर बळजबरी अत्याचार केला. अत्याचार करूनच हा नराधम थांबला नाही तर त्याचा मित्र देवसरी उत्तम चव्हाण यालाही फोन करून बोलावून घेतले. देवसरी चव्हाण यानेही पीडितेवर बळजबरी अत्याचार केला.

मात्र मुलगी सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने पीडितेच्या वडिलांनी मानोरा पोलिस ठाणे गाठले. ही बाब आरोपी मिथुन राठोड याला माहीत झाल्यानंतर त्याने नितीन पवार याला सांगितले. त्यानंतर नितीन पवार याने सदर पीडितेला दुचाकीवर बसवून मानोरा येथे गणेश मंदिर परिसरात सोडून तेथून पोबारा केला.

युवतीने त्यानंतर पोलिस ठाणे गाठून तीन आरोपीच्या नावे फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मिथुन जनार्दन राठोड, नितीन दयाराम पवार व देवसरी उत्तम चव्हाण या तिघांविरोधात जबरी सामूहिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या प्रकरणात नितीन पवार व मिथुन राठोड या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालया समोर हजर केले असता आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT