नांदेड शहरासाठी १०० कोटी निधी मिळणार 
नांदेड

नांदेड शहराच्या विकासासाठी 100 कोटीचे विशेष अनुदान

भाजप सरकारच्या काळात नांदेड वाघाळा महानगरपालिकेत शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला होता.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोवीड संक्रमणाच्या कालावधीत सुद्धा शहर विकासासाठी कांही महिन्यापूर्वी 50 कोटींचा निधी राज्य शासनाकडून मिळवून घेतल्यानंतर शहरातील प्रलंबित विविध विकास कामांसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासनाने आणखी 100 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मनपाला दिले आहे. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून हाती घेण्यात येणारी कामे मनपा यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहेत.

भाजप सरकारच्या काळात नांदेड वाघाळा महानगरपालिकेत शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे शहराचा विकास ठप्प झाला होता. परंतु मागील वर्षी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यभार देतांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सोपविण्यात आली.

हेही वाचा - महावितरणची मोहीम: आकोडे टाकत वीजचोरणाऱ्या 26 आकोडेबहाद्दरांवर कारवाई

त्यानंतर त्यांनी विकासकामांचा झपाटा सुरु केला. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणखी अतिरिक्त निधीची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशिर्षकाखाली राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल 100 कोटी रुपये नव्याने मंजूर करुन घेतले आहेत.

येथे क्लिक करा - राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या चक्काजाम

या निधीमुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यासह विविध विकासकामे पुर्णत्वास जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडकरांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier Death:जवानाच्या चितेला अग्नी देण्यासाठी ८ तासांच बाळ अन् पत्नी स्ट्रेचवरून आली, सातारा हळहळला; मुलीचा चेहरा पाहण्याआदीच मृत्यूने गाठलं...

Sambhajinagar Crime : धक्कादायक ! मामीचा अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार अन् ... संतापजनक घटनेने शहरात खळबळ

Police Officer Accident : कोल्हापूरच्या पोलिस अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कर्नाटकात घटना

Backwater Tourism: पर्यटन प्रेमींसाठी खास! भारतातील या ठिकाणी मिळतो हाऊसबोट स्टेचा आनंद

Premanand Maharaj: देव स्वतः आपल्याला पाप करण्यापासून का रोखत नाही? ; प्रेमानंद महाराजांनी रहस्य उलगडलं

SCROLL FOR NEXT