किसान रेल्वे  
नांदेड

नगरसोल येथून १५० वी किसान रेल्वे रवाना; शेतीमालाच्या वाहतुकीत वाढ

या १५० किसान रेल्वेमधून आजपर्यंत ४७ हजार ९५७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे नवी दिल्ली, गुवाहाटी, मालडा टाऊन, अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल (Nagarsol) येथून १५० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊन येथे सोमवारी (ता. १०) रवाना झाली. नांदेड रेल्वे (Nanded rail) विभागातून या वर्षी ता. पाच जानेवारी, २०२१ रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त १२६ दिवसात १५० किसान रेल्वेने नगरसोल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचविले आहे. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात येत आहे. अनेक शेतकरी, व्यापारी याचा लाभ घेत आहेत. फक्त १२६ दिवसात १५० किसान रेल्वे चालविल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी (divisional rail manager) अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. 150th Kisan Railway departs from Nagarsol; Increase in transportation of agricultural commodities

या १५० किसान रेल्वेमधून आजपर्यंत ४७ हजार ९५७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे नवी दिल्ली, गुवाहाटी, मालडा टाऊन, अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. यामुळे कांदा, टरबूज आणि द्राक्षे उत्पन्न करणारे शेतकरी किसान रेल्वेचा लाभ घेत येत आहेत. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून सुद्धा किसान रेल्वे सुरु करण्याकरिता संबधित बी. डी. यु. टीममधील अधिकारी प्रयत्नरत आहेत. मालवाहतूक भाड्यात ५० टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी मित्रांनी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

हेही वाचा - हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपिट; सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील स्थिती

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करुन देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेलचालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. किसान रेल्वेचे वैशिष्ठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण ५० किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स– टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.

नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढावी म्हणून उपिंदर सिंघ यांनी बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ची टीम गठीत केली आहे. या टीममध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेलीय. हे अधिकारी नांदेड रेल्वे विभागातील विविध ठिकाणी भेटी देवून मालवाहतूक वाढवण्याकरिता सतत प्रयत्न करत आहेत. यामध्ये जी. चंद्रशेखर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, ए. श्रीधर वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, उदयनाथ कोटला वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, शेख मोहम्मद अनिस वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता यांचा समावेश आहे. तसेच मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांशी सतत संपर्कात राहण्या करिता डॉ. अनिरुद्ध पमार विभागीय परिचाल व्यवस्थापक आणि व्ही. रविकांत सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT