रेल्वेखाली मेंढ्याचा चुराडा 
नांदेड

कृष्णा एक्सप्रेसखाली २०० मेंढ्या चिरडल्या; धर्माबादजवळील घटना

बासरपासून पाच किमी अंतरावरील फकिराबाद रेल्वेस्टेशन जवळील घटना

सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : धर्माबाद शहरापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या व तेलंगणा राज्यातील बासर तीर्थक्षेत्रापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या फकीराबाद रेल्वे स्थानकादरम्यान काल मध्यरात्री कृष्णा एक्सप्रेसने जवळपास दोनशे शेळ्या व मेंढ्याना चिरडण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सदरील घटनेमुळे तेलंगाना व महाराष्ट्र सीमेवर हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

तेलंगणा राज्यातील नवीपेठ मंडळमध्ये येत असलेल्या फकीराबाद रेल्वे स्थानकादरम्यान मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर शेळ्या मेंढ्या थांबल्या होत्या. मेंढपाळांना रेल्वे गाडी येण्याचा अंदाजच नव्हता.

हेही वाचा - या मालिकेतील दोन्ही अभिनेत्रींना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत होते.

तेवढ्यात धडधडत अशी सुसाट वेगाने कृष्णा एक्सप्रेस आली आणि सर्व शेळ्या- मेंढ्यांना चिरडून निघून गेली. सदरील घटनेमुळे त्या मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार त्यास आर्थिक मोबदलाही मिळणे कठीण झाले आहे. सदरील घटनेमुळे मात्र तेलंगाना व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : “विंचूर हादरलं पेठेत प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद”

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT