305 report corona positive nanded sakal
नांदेड

नांदेड : ३०५ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

४०३ रुग्ण आजारातून झाले बरे : दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट व मृत्यू दर शुन्यावर आला होता. रविवारी (ता.३०) प्राप्त झालेल्या एक हजार ६१३ अहवालापैकी ३०५ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात ४०३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. रविवारी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या प्रकृती अतिगंभीर असलेल्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या एक लाख एक हजार २८८ एवढी झाली असून यातील ९६ हजार ८१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६७ झाली आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत १४७, नांदेड ग्रामीण १८, लोहा १०, बिलोली नऊ, माहूर दोन, कंधार १६, मुदखेड १०, भोकर दोन, हदगाव दोन, मुखेड ११, नायगाव ११, देगलूर ११, किनवट १२, हिमायतनगर दोन, हिंगोली सात, आंध्रप्रदेश एक, पंजाब एक, उमरी १८, अर्धापूर पाच, वाशीम एक, उमरखेड दोन, अकोला एक, औरंगाबाद तीन, चंद्रपूर एक, मुंबई एक, नागपूर एक, असे एकूण ३०५ बाधित आढळले आहेत.

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या खडकपूरा येथील २८ वर्षीय महिला व मुखेड तालुक्यातील शेवडी तांडा येथील ३० वर्षिय पुरुष असे दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २९, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण एक हजार २९३, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात एक हजार १७३, किनवट कोविड रुग्णालय दोन, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३५ असे एकूण दोन हजार ५३२ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT