file Photo 
नांदेड

जिल्ह्यात ३४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू, सोमवारी ३४ रुग्ण कोरोनामुक्त, ३२ अहवाल पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर असून, सोमवारी (ता. सात) कोरोना अहवालानुसार ३२ जण पॉझिटिव्ह तर ३४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ३४२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या ६६७ अहवालांपैकी सोमवारी ६३२ निगेटिव्ह, ३२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २० हजार ६२६ एवढी झाली आहे. 

यातील १९ हजार ५३९ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. रुग्णालयात औषधोपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी २० जणांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेले लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के 

बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - एक, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - सहा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड -पाच, मुखेड- दोन, कंधार - १६ आणि खासगी रुग्णालयातील चार असे एकूण ३४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के ७२ अंश इतके आहे. 
सोमवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २१, लोहा- एक, भोकर - एक, अर्धापूर - एक, धर्माबाद - तीन, देगलूर - एक, उत्तरप्रदेश - एक, मुखेड -एक, परभणी - एक, गुजरात - एक असे एकूण ३२ बाधित आढळले. जिल्ह्यात ३४२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

सोमवारी खाटांची संख्या 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३, जिल्हा रुग्णालय ३२, जिल्हा रुग्णालय नवी इमारत -३०, मुखेड -२४, किनवट- दोन, हदगाव - दोन, देगलूर - दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७०, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण -१४५, खासगी रुग्णालय २२ आहेत. सोमवार खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७९ एवढी आहे. 

कोरोना मीटर ः 

सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३२ 
सोमवारी कोरोनामुक्त - ३४ 
सोमवारी मृत्यू- एक 
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २० हजार ६२६ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ५३९ 
एकूण मृत्यू संख्या- ५५१ 
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३९४ 
अतिगंभीर रुग्ण - २० 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT