आर्थिक गुंतवणूक- नांदेड : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ४०६ कोटी रुपये जमा  
नांदेड

नांदेड : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ४०६ कोटी रुपये जमा

जिल्हा बॅँकेची माहिती; जिल्ह्यात सव्वासात लाखाहून अधिकांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्य शासनाकडून राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुदान अर्थसहाय्य करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यासाठी ४२४ कोटी एक लाख रुपये अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्ह्यातील सात लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४०६ कोटी १४ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

बँकेचे मुख्य अधिकारी अजय कदम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, बँकांच्या शाखामध्ये होणारी गर्दी व त्यातून शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने खातेधारक शेतकऱ्यांना एटीएम कार्ड देऊन दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकेचील कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन बँक खातेधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना एटीएम कार्ड देण्याचे काम केले आहे.

अतिवृष्टी अनुदान वाटपात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीने बँक प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करत आहे. तरी देखील धर्माबाद तालुक्यातील संलग्नीत असलेल्या शाखांशी असलेल्या काही गावातील शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या व अनुदान रक्कमेचा धनादेश उशीराने मिळाल्याने ती गावे वगळता इतर सर्व गावांच्या याद्या अद्ययावत करुन शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बँकेमार्फत ज्या शेतकऱ्यांना एटीएम कार्ड मिळाले आहे. त्या शेतकऱ्यांनी खात्यातून रक्कम देखील उचलली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून (ता. सहा) रक्कम जमा करण्याचे काम सुरु झाले असून, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यांच्या खात्यात बँक लकरात लवकर रक्कम जमा करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचे डॉ. अजय कदम यांनी सांगितले. शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, ज्या शेतकरी बांधवांना एटीएम कार्ड मिळालेले आहे त्यांनी एटीएमचा वापर करावा. बँकेत अनावश्‍यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT