file photo 
नांदेड

नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 44 कोटी 71 लाख मंजूर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात विकासाचा झपाटा सुरुच ठेवला असून नर्सिंग महाविद्यालय मंजूरीनंतर येथील श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन स्वतंत्र विभागीय इमारतीच्या बांधकामांसाठी 44 कोटी 71 लाख रुपये मंजूर करुन घेतले आहेत.

विकास कामात आघाडीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकास कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ठप्प झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात विकास कामांचा झपाटा सुरु झाला आहे. नांदेडात ईबीसी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु असलेल्या शासकीय बी. एड. कॉलेजच्या इमारतीसाठीही साडेचौदा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कांही दिवसांपूर्वीच विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर झाले आहे.

श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयास ऑटोनॉमसचा दर्जा आहे

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालय मंजूर होऊन दोन दिवस उलटल्यानंतर लगेच येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन व स्वतंत्र इमारतीच्या बांधकामांसाठी 44 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. येथील  श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयास ऑटोनॉमसचा दर्जा आहे. हा दर्जा अधिक उंचावावा  यासाठीच नवीन इमारतीसाठी अशोक चव्हाण निधी मंजूर करुन घेतला आहे. या निधीतून नवीन इमारतीमध्ये तळमजला व त्यावर तीन मजल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. हे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर या संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT