rain rain
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पाऊस

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदाही भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे

सकाळ वृत्तेसवा

नांदेड: जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने जुलैमध्येही जोर धरला आहे. या पावसामुळे खरिप पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यंदा पावसाळ्याच्या दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर आठ मंडळात तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात हमखास पावसाचे क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८१४.१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याची सरासरी ८९१.३० मिलीमीटर आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदाही भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याप्रमाणे पावसाचे आगमनही झाले. जूनमध्ये जोरदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यतंरी ओढ दिल्याने पिके धोक्यात आली होती. परंतु जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरल्याने खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा ता. एक जून ते ता. १५ जुले या दीड महिन्याच्या काळात जिल्ह्यात ५६.३० टक्क्यानुसार सरासरी ४५०.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील उमरी मंडळात सर्वाधिक ३५२ मिलीमीटर पाऊस झाला तर सर्वात कमी सरसम मंडळात १४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.

आठ मंडळात जास्त पाऊस
जिल्ह्यातील आठ मंडळात तीनशे मिलीमीटरपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. यात उमरी ३५२, मुदखेड ३३४, तरोडा ३३२, शिवणी ३३२, कापसी ३२५, कुंडलवाडी ३१८, अर्धापूर ३०२ तर सिंधी मंडळात ३०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ४५ मंडळात दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाला. तर २८ मंडळात दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Latest Marathi News Live Update : चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक आक्रमक

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

'मिलिंद आणि माझ्यात 21 वर्षांचं अंतर होतं...' मिलिंद सोमणसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली, 'आमचं ओपन रिलेशन...'

SCROLL FOR NEXT