korona virus desease logo.jpg
korona virus desease logo.jpg 
नांदेड

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सप्तरंगी मंडळाकडून ‘एसिपी’ उपक्रम....काय ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांचे नैतिक कर्तव्य म्हणून येथील सप्तरंगी साहित्य मंडळाकडून प्रत्येक घरांत एसिपी म्हणजे ‘अन्टी कोरोना पोलिस’ हा उपक्रम राबविण्यात यावा, या बाबत सर्व कवी, साहित्यिकांना आणि त्यांनी त्यांच्या संपर्क क्षेत्रातील इतरांना आवाहन करावे, असा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. या बाबतचा अंतिम मसुदा मंडळाच्या समाज अभ्यास समितीने तयार केला असून तो लाॅकडाऊन संपेपर्यंत दररोज प्रसारीत करण्यात येणार आहे, अशी माहिती अभ्यास समितीप्रमुख गंगाधर ढवळे यांनी दिली. 

शृंखला खंडीत करण्यासाठी ‘एसिपी’
लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. अशात साठावा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. हा दिवस म्हणजे मराठी माणसाला मिळालेले स्वातंत्र्यच होय. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखून कोरोनावरील विजय हा खरा महाराष्ट्र दिन साजरा होईल यासाठी साहित्य मंडळाने अधिकाधिक काळजी घेऊन ही शृंखला खंडीत करण्यासाठी ‘एसिपी’ (अन्टी कोरोना पोलिस) हा उपक्रम आणला आहे. या उपक्रमात प्रत्येक घरातच एका एसीपीची नियुक्ती करायची आहे. हे एसिपी बाहेर जाणे अत्यावश्यकच असल्यास मास्क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक करतील. बाहेरून घरात येणाऱ्या लोकांना निर्जंतुकीकरण करण्यास सांगतील. हे एसिपी घरातील वयोवृद्ध तसेच आजारी व्यक्तीची काळजी घेतील. 

चुकीच्या माहितीची करणार खात्री
चुकीची माहिती फोनद्वारे अफवा अतिरंजित माहिती वा व्हिडिओ यांची खात्री करतील आणि वेळीच अशा प्रकरणांना थांबवतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यास प्रयत्नशील असतील. असा सोपा आणि सहज पद्धतीने राबविण्यात येऊ शकणारा आणि जागरुकता निर्माण करणारा असून कुटुंबप्रमुखांनी घरातील जाणत्या व्यक्तिची एसिपी म्हणून नियुक्ती करावी अशी विनंती मंडळाकडून तयार करण्यात आलेल्या मसुद्यात करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट मिळाली असली तरी ग्रीन झोन आणि आॅरेंज झोनमध्ये बाहेर जाणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टन्सचा वापर करणे अनिवार्य आहे, असेही एसीपीने सुचवायचे आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
या उपक्रमाचा आराखडा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. या बाबत आपल्या संपर्कक्षेत्रातील सर्व साहित्यिक, कवी मित्रांना पुढाकार घेण्याचे आवाहन सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सचिव पांडुरंग कोकुलवार, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कार्याध्यक्ष मारोती कदम, शंकर गच्चे, राज्य संघटक प्रशांत गवळे आदींनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT