Nanded Photo 
नांदेड

असा आहे योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल असा विश्वास नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. रविवारी (ता. २१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सकाळी शासनाच्या निर्देशाचे पालन करीत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन हा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला.

हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/dionanded/  या फेसबुक पेजवरुन लाईव्ह करण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत जागतिक योग दिवसाचा कृतिशील संदेश पोहोचविणे शक्य झाले. 

आंतरराष्ट्रीय योगासन साधक श्रेयस मार्कंडेय व डॉ. शर्मिली पाटील यांनी योगाभ्यासाचा सराव घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक हे सुरक्षित व अंतर ठेवून नियमाचे पालन करीत योग अभ्यासात सहभागी झाले होते. 

मनस्वास्थ्य महत्त्वाचे आहे

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी योग ही जीवनशैली असून, ती प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली व निरोगी आयुष्यासाठी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक एकात्मता तेवढीच आवश्यक असते. या तीन सुत्रांना योगाभ्यासाद्वारे स्वत:च्या मनावर ताबा मिळविता येणे शक्य होते. शारीरिक स्वास्थाबरोबर मनस्वास्थही अधिक महत्वाचे असून योगाभ्यासाद्वारे हे सहज साध्य होते.

योगाचे महत्त्व जाणून घ्या

सतत कामाच्या मागे धावत असलेल्या व्यक्तीने स्वतःचे आयुष्य खुप गुंतागुंतीचे करुन ठेवले आहे. त्यामुळे अनेकांना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. धावपळीच्या या युवगात व्यक्तीला तरुण वयात अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याधिकारी यांनी इतिशय तळमळीने आरोग्यासाठी केलेले मार्गदर्शन नक्कीच जनतेला तनावमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत राहिल. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. यशवंत पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले.

स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ राखून ठेवावा

अनेकांना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. धावपळीच्या या युवगात व्यक्तीला तरुण वयात अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी जिवन जगायचे असले तर, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ राखुन ठेवून योग केल्यास त्या व्यक्तीस तनावमुक्त जिवन जगण्यास मदत होईल.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT