file photo 
नांदेड

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार (ता. 21) मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 परीक्षेच्या अनुषंगाने शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पूनर्वसन विभागाकडून विविध सूचना दिल्या आहेत. या परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआरद्वारे कोविड-19 ची चाचणी करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी ता. 17 व ता. 18 मार्च 2021 रोजी करुन चाचणीचा अहवाल विचारात घेऊन आवश्यकता भासल्यास योग्य ती व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल.  

शासनाच्या या सूचनांनुसार सर्व महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक प्राधिकरण तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथील शासनमान्य चाचणी केंद्रावर परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणीची व्यवस्था संचालक, आरोग्य सेवा यांच्या ता. 16 मार्च 2021 रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी म्हणजे रविवार ता. 21 मार्च 2021 रोजी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी जवळ बाळगणे व आवश्यकतेनुसार संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना दाखविणे आवश्यक राहील. फक्त परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीताच चाचणीची व्यवस्था करण्यात आली असून त्याकरीता संबंधितांचा कोणताही खर्च करावा लागणार नाही.

एखाद्या कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आढळून आल्यास त्याच्या बदली पर्यायी व्यवस्था करणे अनिवार्य आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या कामासाठी पुरेशा संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची आत्यंतिक दक्षता घेण्यात यावी. प्रतिबंधित क्षेत्र अथवा लॉकडाऊनमुळे उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्यास विलंब होणार नाही अथवा अडचणी निर्माण होणार नाहीत याविषयी विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत. परीक्षेची संवेदनशीलता लक्षता घेऊन प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने उचित कार्यवाही करण्याबाबतही संबंधितांना कळविण्यात यावे. या व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना तात्काळ अवगत करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT