File photo 
नांदेड

कोरोनात सर्व थांबले...मात्र शेतकऱ्यांच्या शेतीने रोजगाराला तारले 

प्रमोद चौधरी

नांदेड : रब्बीचा हंगाम संपता संपता मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत गेल्याने सरकारला वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागल्याने सर्व जग एका बाजूला थांबले असतांना फक्त शेती व्यवसाय सुरू राहिला. 

या काळात सर्व व्यवसाय थांबले असतांना शेतीने अर्थचक्र चालवत अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करत निसर्गाच्या दुष्टचक्रात आशेचा किरण मजुरांना दाखविला आहे. मात्र त्याच मजुरांनी आज एकत्र सर्व हंगाम आल्याने त्याच शेतकऱ्याला कात्रीत पकडले आहे. सध्या खरीप हंगामाच्या कामांची शेतीत रेलचेल चालू असून मजुरांची टंचाई भासत असल्याने मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. 

यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातल्याने वेगवेगळ्या टप्प्यात कधी कडक तर कधी दिलासा देणारा लॉकडाऊन पाडल्या जात असल्याने सर्व उद्योग चालू बंद होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येऊन अनेकांनी घरचा मार्ग पकडला आहे. अशाही स्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून सुरुवातीला रब्बीच्या हंगामाच्या ग्रामीण भागात तरी अनेकांचा रोजगार हा शेतीतून सुरूच राहिला. सध्या खरीप हंगामातील पीक काढणी व कापूस वेचणीला सुरुवात झाली असून मका व सोयाबीन सोंगण्यासोबतच कापूस वेचणी सोबत आल्याने मजुरांची एकच कमतरता भासत आहे.

त्यामुळे मजुरांनीही दरात वाढ करून अव्वाच्या सव्वा भाव ठरवून ज्या शेतकऱ्यांनी कठीण काळात मजुरांना तारले त्यांनाच संकटात टाकले आहे. मका सोंगणीचा दर सध्या प्रति एकर साडेतीन हजारांपासून पाच हजारापर्यंत असून कापूस वेचणीसाठी प्रति किलो सहा ते दहा रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे अगोदर अवकाळी व आता मजुरांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. 

निसर्गाने मारले..मजुरही ऐकेनात
मागील वर्षीच्या रब्बी सोबत या वर्षीही खरीप हंगाम काढणीच्या वेळेसच वादळी वाऱ्याने थैमान घालून शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान केले. आता कुठे पाणी थांबले व पूर्ण हंगामच काढणीला एकत्र आल्याने मजुरांनी दर वाढविले आहे. एवढे सर्व संकट असतांनाच सध्या सर्व मालाच्या भावात भिजडीच्या नावाखाली घसरण झाली आहे. मका एक हजार, सोयाबीन तीन हजार ८०० रुपये प्रति क्विंटल तर आता वेचणीतून येणारा नवीन कापूस तीन हजारापर्यंत घेतला जात असल्याने एकप्रकारे सर्वच शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याचे वस्तव बघायला मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT