file photo
file photo 
नांदेड

विजय सिंघल यांची महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून विजय सिंघल (भाप्रसे) यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. यापूर्वी विजय सिंघल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व त्याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. 

भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ बॅचचे विजय सिंघल अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुरकीमधून स्थापत्य याविषयात अभियांत्रिकी पदवीचे सुवर्णपदक पटकाविले आहे. सोबतच आयआयटी दिल्लीमधून बिल्डींग सायन्स व कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही एमटेक आणि लंडन येथे पब्लिक सर्विसेस पॉलिसी व मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.

या अगोदर विजय सिंघल यांनी जिल्हाधिकारी (हिंगोली, जळगाव), मुख्य कार्यकारी अधिकारी, (अहमदनगर, औंरगाबाद) महानगरपालिका आयुक्त (ठाणे, कोल्हापूर), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (मुंबई) तसेच साखर आयुक्त, उद्योग आयुक्त म्हणून महत्वाच्या पदांवर काम केले आहे. 

नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख प्रशासनासाठी आग्रही असलेले विजय सिंघल यांना जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामगिरीसाठी प्राईम मिनिस्टर अवॉर्ड एक्सलेन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला आहे. या नदीजोड प्रकल्पातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. तसेच विशेष निमंत्रणावरुन त्यांनी ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) व न्यूयॉर्क (यूएसए) येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नदीजोड प्रकल्पावर व्याख्यान दिले आहे. या प्रकल्पाचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतातील ‘सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी’या विभागात मुंबई शहरासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रशासनामध्ये विविध डिजिटल उपक्रम, ऑनलाईन यंत्रणा आदींसाठी विजय सिंघल यांना महाराष्ट्र शासनाचे सूवर्णपदक, रौप्यपदक तर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT