फोटो 
नांदेड

‘कम्युनिटी किचन’चे कौतुक- खासदार चिखलीकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखालीलॉकडाउनच्या काळात मागील जवळपास ५५ दिवसांपासून भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले व त्यांचा ‘कम्युनिटी किचन’ उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाच्या ठिकाणी नुकतीच खासदार चिखलीकर यांनी भेट दिली. या ठिकाणी सुरु असलेले काम बघुन त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्व टिमचे कौतुक केले. यावेळी कम्युनिटी किचनच्या मार्फत बनविण्यात आलेल्या जेवणाचा स्वादही घ्यायला ते विसरले नाहीत.

भाजपा पक्षाच्या सुचनेनुसार महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी लॉकडाउन जाहीर होताच सुरवातीला नाश्त्याची सोय करण्यात येत होती. परंतु आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढणाऱ्या यौद्ध्यांना जेवन वाटप करण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी, परिचारीका, तसेच या लढाईत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍यांना जेवण वाटप करण्यात येत आहे. तसेच रामनवमी, हनुमान जयंती,  भिमजयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, बुद्ध पोर्णिमाआदी निमित्त वेगवेगळे व्यंजन तयार करण्यात आले.

५५ दिवसापासून ही सेवा 

मागील ५५ दिवसापासून ही सेवा अखंडीतपणे सुरु आहे. ही सेवा अविरतपणे देण्यासाठी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे, मंजिरी पुरंदरे, वैभव  कुलकर्णी, विभावरी कुलकर्णी, शांभवी साले, कार्यवाह कुणाल गजभारे तसेच अ‍ॅड. अमोल मुनेश्वर, बाळ टोम्पे, शुभम चिंतावार, बाळु नरवाडे, विशाल शुक्ला आदीजण परिश्रम घेत आहेत.

खाद्यपदार्थाचा घेतला आस्वाद

या कम्युनिटी किचनला खा. चिखलीकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कम्युनिटी किचनमार्फत सुरु असलेले काम बघून समाधान व्यक्त केले. तसेच मागील ५५ दिवसापासून कोरोना यौद्ध्यांना अविरतपणे जेवन पुरवित असल्याबद्दल प्रविण साले व त्यांच्या टिमचे कौतुक केले. यावेळी त्यांनी आज कम्युनिटी  किचनमध्ये बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचा अस्वादही घेतला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी गंगाधर जोशी, विजय गंभीरे, उभनलाल यादव, संदिप कऱ्हाळे पाटील, सचिन देशपांडे, सुनिल भालेराव, मनोज जाधव आदींची उपस्थिती होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT