gat sheti.jpg 
नांदेड

गटशेती योजनेंतर्गत ‘डीपीआर’ची मंजुरी रखडली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या कृषी विभागांतर्गत गटशेती योजना २०१८ - २०१९ या वर्षातील डीपीआरला गटशेती योजनेंतर्गत तत्काळ मंजुरी देण्याची मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे केली आहे.

दोन वेळेस बैठक होऊन अद्याप मंजुरी नाही
राज्य सरकारच्या कृषी विभागांतर्गत गटशेती योजना २०१८ - २०१९ या वर्षात जिल्ह्यात सहा गटांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिली होती. त्यानंतर त्या गटांना त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सविस्तर प्रकल्प आराखडा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर डीपीआरला जिल्हास्तरीय कमिटीच्या वतीने मंजुरी देण्यात येत असते. जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिल्यानंतर गटांना त्यांच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यानुसार योजनांचा लाभ मिळत असतो. त्यानुसार राबवायचा असतो. जिल्हास्तरीय कमिटीची दोन वेळेस बैठक होऊनही अद्यापही जिल्ह्यातल्या पाच गटांना मंजुरी दिली नाही.

बैठक घेवून डीपीआरला द्यावी मंजूरी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी तत्काळ बैठक घेऊन उर्वरित पाच गटांच्या सविस्तर प्रकल्प आढावा, डीपीआरला मंजुरी देऊन शेतकरी गटास काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी गटाच्या वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नाव नोंदणीशी आधार संलग्न करावा
जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत www.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार क्रमांक आपल्या नोंदणीशी संलग्न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढे भविष्यात नाव नोंदणी आधार लिंक असेल तरच उमेदवारांची नाव नोंदणी ही उद्योजकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. सर्व नोंदणीकृत नोकरी इच्छूक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवरील नाव नोंदणीस आधार लिंक करुन घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, सुनेकडून ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT