ashok chavan sakal
नांदेड

नांदेड : जिल्ह्यात ५१२ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाण; नियोजन समितीची वार्षिक योजनेवर बैठक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २०२२ - २३ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१२ कोटी चार लाख ७२ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण(ashok chavan) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. नऊ) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत(district planning committee) मान्यता देण्यात आली.

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात झालेल्या बैठकीस आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, समिती सदस्य हरिहरराव भोसीकर, एकनाथ मोरे, प्रकाश वसमते, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने हे प्रत्यक्ष तर आमदार राम पाटील रातोळीकर, श्यामसुंदर शिंदे, माधवराव पाटील जवळगावकर, राजेश पवार, डॉ. तुषार राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व इतर सदस्य हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी स्वागत केले.२०२२-२३ च्या प्रारुप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ३०३ कोटी ५२ लाख ८० हजार, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १६३ कोटी, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी ४५ कोटी ५१ लाख ९२ हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय चालू वर्षातील पुनर्विनियोजन प्रस्तावात बचत नऊ कोटी ११ लाख ५५ हजार असून मागणी ८६ कोटी २५ लाख ४९ हजार रुपयांची आहे. जिल्ह्यातील कार्यान्वित यंत्रणाना वितरीत केलेला निधी डिसेंबर २०२१ अखेर एकुण वितरीत तरतुद ८६ कोटी ६० लाख ३४ हजार रुपयांपैकी झालेला खर्च ६३ कोटी ५६ लाख २० हजार रुपये एवढा झाल्याचे सांगण्यात आले.

पशुच्या संख्येचे निकष ठरवून पशुवैद्यकीय दवाखाने उभारणी व अद्ययावतीकरण करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांचे बांधकाम करावे. कोविड उपाययोजनेसाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवण्यात यावा. अनेक विभाग प्रमुखांनी प्रलंबित कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राप्त निधी मार्च अखेर खर्च करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.

जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी सुत्रसंचालन व सादरीकरण केले. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. काळम यांच्यासह समिती सदस्य, विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT