पालकमंत्री अशोक चव्हाण; विविध प्रभागांत प्रचारसभा sakal
नांदेड

नांदेड : अर्धापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध

पालकमंत्री अशोक चव्हाण; विविध प्रभागांत प्रचारसभा

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : शहरातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ते, नाली आदी विकास कामे केली आहेत. त्यामुळे शहराचा कायापालट होत आहे. विरोधी पक्ष केवळ आरोप करण्याचे काम करत आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण रुग्णालय,(Hospital) पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. विरोधी पक्षाच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, शहराच्या विकासाची हमी मी घेतो, अशी ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी बुधवारी (ता १५) दिली.

नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. नगरपंचायतीच्या तेरा प्रभागासाठी कॉँग्रेसने बारा जागेवर उमेदवार उभे केले असून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अपक्ष उमेदवाला पुरस्कृत करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चव्हाण यांनी सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सहा, आठ, बारा प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आल्या. त्यांच्यासोबत आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार जितेश आंतपूरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, बी. आर. कदम, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, सुरेश हाटकर, संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, अर्धापूर शहरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून प्रत्येक घराला नळजोडणी करण्यात येणार आहे. शहरातील वसमत फाटा ते स्वातंत्र्यसेनानी पेट्रोल पंप या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच काम सुरू करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT