अशोक चव्हाण आढावा बैठक 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील साठवण तलावांची कामे मार्गी लावा- अशोक चव्हाण

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभाग प्रमुखांकडून घेतला.

अभय कुळकजाईकर

नांदेड ः जिल्ह्यातील अनेक भागात सिंचनाच्या पर्याप्त सुविधा नसल्याने त्या ठिकाणी कृषी व इतर क्षेत्रासाठी शासनाने भौगोलिक रचनेनुसार शक्य त्या भागात साठवण तलावासाठी मान्यता दिली आहे. ही मान्यता देऊनही अनेक प्रकल्प किरकोळ कारणांवरुन मार्गी लागले नाहीत. प्रशासकीय पातळीवर भूसंपादनापासून ज्या काही अडचणी असतील, त्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करुन साठवण तलावाची कामे तत्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभाग प्रमुखांकडून घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीस आमदार अमर राजूरकर, महापौर मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार आदी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा- नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीवरुन राजकारण नको; विकासावर व्हावी चर्चा

समन्वयातून तत्काळ कामे मार्गी लावा

भोकर तालुक्यातील दिवशी सिंचन तलाव, पाकी काळडोह साठवण तलाव, देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलाव, नायगाव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलाव याबाबत त्यांनी आढावा घेतला. दिवशी सिंचन तलावाच्या भूसंपादनाची संयुक्त मोजणी झाली आहे. पाकी काळडोह साठवण तलावाला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. देगलूर तालुक्यातील येरगी साठवण तलावालाही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. नायगाव तालुक्यातील सोमठाणा साठवण तलावासाठी लागणाऱ्या ४९.८१ हेक्टर जमिनीचा अंतिम निवाडा जाहीर झाला आहे. या सर्व प्रकल्पांच्या पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन विभाग यांनी परस्पर समन्वयातून तत्काळ कामे मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले. याचबरोबर इतर प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी अजय बाहेती 'ईडी'च्या कोठडीत

भुयारी मार्गाचा घेतला आढावा

मुदखेड शहरातील रेल्वे क्रॉसिंगमुळे उद्भवणाऱ्या अनेक अडचणी व त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रस्तावित भुयारी मार्ग व त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. मुदखेड शहर वाढत असल्याने रेल्वेच्या दोन्ही बाजू वसलेले शहर सुरक्षित जोडण्यासाठी आता गत्यंतर राहिले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिने यावर तात्काळ मार्ग काढणे गरजेचे असून येणारे अडथळे समन्वयातून दूर करण्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक भर दिला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT