Ashok Chavan esakal
नांदेड

जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मार्गी लावला : अशोक चव्हाण

भाजप सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्याचा विकास खुंटला होता. त्यास गेल्या दोन वर्षांत हजारो कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याने विकासाला पुन्हा चालना मिळाली आहे.

प्रमोद चौधरी

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्याचे काम सुरु झाले आहे. भाजप (BJP) सरकारच्या काळात जिल्ह्याचा विकास खुंटला होता. त्यास गेल्या दोन वर्षांत हजारो कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याने विकासाला पुन्हा चालना मिळाली आहे. तसेच जालना - नांदेड समृद्धी महामार्गाचा सुमारे १२ हजार कोटींचा प्रकल्प, बुलेट ट्रेन धावू शकेल, अशा द्रुतगती महामार्गाच्या (Jalna-Nanded Express Way) नियोजनाचे काम सुरु झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. राज्यातील आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी रविवारी (ता.२८) पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकार (Two Years Of Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले. पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून झाले. भविष्यवाणी झाली. अजूनही विरोधकांचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु, आघाडी सरकार अस्थिर होण्यापेक्षा अधिक भक्कम झाले आहे. (Nanded)

कोरोनामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. यात विविध नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत आघाडी सरकारने दोन वर्षे यशस्वी कामगिरी केली आहे. परंतु, केंद्र सरकारने अनेक आघाड्यांवर संघर्ष निर्माण करत राज्याशी असहकाराची भूमिका घेतली. जीएसटीचा परतावा वेळेवर न देता आर्थिक कोंडी केली. परंतु, राज्यातील इतर भागांसह नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकास कामाने समाधानी असल्याचे चव्हाण म्हणाले.

रखडलेल्या कामांना आता चालना

नांदेड जिल्ह्यात भाजपच्या काळात रखडलेल्या विकास कामांना आता चालना मिळाली आहे. जालना - नांदेड समृद्धी महामार्गाचा १२ हजार कोटींचा प्रकल्प सरकारने मार्गी लावला. २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची आशा आहे. जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन करताना या जागेतून बुलेट ट्रेन धावू शकेल असे नियोजन आहे. यासाठी जालनापासून नांदेडपर्यंत जोडमार्ग करावा अशी विनंती केंद्राला केल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत ईडी, सीबीआयची कारवाई ही राजकीय भावनेतून केल्या जात आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यात एनसीबीने अंमलीपदार्थ विरोधात केलेली कारवाई योग्य आहे.

- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT