vai bazar.jpg 
नांदेड

सहायक जिल्हाधिकारी गेले पाड्यावर; का ते वाचा

साजिद खान


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः कोरोना आजाराच्या वाढत्या संक्रमणामुळे जनजीवन थांबले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या माहूर, किनवट तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील आदिम व आदिवासी खेडे, वाडी, पाड्यांतील लोकांना कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हे जाणून घेण्यासाठी आणि जीवनावश्यक अपूर्ण गरजा पूर्ण करून देण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मंगळवारी (ता. पाच) वाई बाजार येथील कोलामखेड व गोंडखेड येथे भेट देऊन आढावा घेतला.


लाभार्थींना तातडीने लाभ देण्याचे आदेश
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कोरोना आजार नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आज वाई बाजारला भेट देऊन सर्वप्रथम अँटी कोरोना फोर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील व त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या उपकेंद्रांचा सुविधेसंदर्भातील आढावा व आरोग्याच्या दृष्टीने विशेष सूचना देण्यात आले. त्या बरोबरच शासकीय आश्रम शाळा तुळशी यांच्या माध्यमातून कोलामखेड येथील आदिम जमाती कोलाम बांधवांना वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याचा मागोवा घेण्यात आला आणि घरकुल योजनेतून वंचित लाभार्थींना तातडीने लाभ देण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले.


सभामंडपची पाहणी
गोंडखेडा येथील रस्ते, पाणी, आरोग्य दिवाबत्ती आदींबरोबर ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सभामंडपची पाहणी करण्यात आली. शिवाय सहायक जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी राबविलेल्या जात प्रमाणपत्र उपक्रमांतर्गत तलाठी विश्वास यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुकही गोयल यांनी केले. सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव गोयल यांनी घेतलेल्या विविध आढावा कार्यक्रमांत प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, मंडळाधिकारी टी. आर. सुगावे, पुरवठा विभागाचे अव्वल कारकून व्ही. बी. जळमकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजारचे वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास हुलसुरे, तलाठी विश्वास फड, महिला पोलिस पाटील आशाबाई बळिराम मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास बेहेरे व सामाजिक कार्यकर्ते नविद खान यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Kannad Minor Boys Missing : शाळेत जातो म्हणत घराबाहेर पडले; कन्नडमधील तीन अल्पवयीन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता!

Dombivli Elections : कल्याण–डोंबिवली रणधुमाळीत मनसेचा प्रयोग; जैन समाजातील उमेदवार मैदानात!

Palghar News : ७/१२ वर खोट्या नोंदींचा आरोप; मोखाडा तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT