file photo  
नांदेड

महिलांनी स्वयं सहायता समुहाने करावी जागृती; कोण म्हणाले वाचा? 

सकाळवृत्तसेवा

नांदेड - ग्रामिण भागातील महिलांना कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लोकांना लोकशिक्षण प्रचार प्रसार करणात येत आहे, राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान - उमेद अंतर्गत राज्य अभियान कक्ष (मुंबई), जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतर्फे ग्रामीण भागातील उमेद

अभियानात कार्यरत असलेल्या प्रेरिका, वर्धिनी, बँकसखी, उपजीविका सखी आणि अन्य ग्रामसंघ यांना गुगल मीट ॲपच्या ऑनलाइन प्रशिक्षण (ता. नऊ ते १३ जून) या तीन दिवसीय देण्यात आले. कोरोना महामारीने जगासमोर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, मुंबई - बेलापूर येथील राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळ यांनी उमेद अभियानाद्वारे उपाययोजना, अभियानाची आधारस्तंभ आणि समुदाय स्तरावर या आजाराबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये करावी, प्रत्येक महिला ही या आजाराची मुख्य लक्षणे व त्यावर उपाय काय असायला हवेत. जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक आहे.

समुदाय संसाधन व्यक्ती यांनी समुदायात काम करत असताना घ्यावयाची स्वतःची सुरक्षा वारंवार साबणाने हात धुवून व तोंडाला मास्क वापरूनच बैठक ती ५० टक्के महिलांच्या सभेला उपस्थित राहावे आणि शारिरिक अंतर हे तीन फूट असे असावे. जे लोक या आजाराने बाधित झालेली आहेत त्याच्यावर योग्यरित्या उपचार होत आहेत.

समाजात लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा कलंक व भेदभाव नसायला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या ऑनलाइन प्रशिक्षण बैठकीत वेगवेगळ्या कॅडरच्या महिलांनी सहभागी झाल्या होत्या. या महिलांच्या माध्यमातून प्रत्येक गावात या महिला योग्य रितीने समुपदेशन कोरोनाविषयी करतील, असा आशावाद व्यक्त केला.

जगभरात या आजाराने थैमान घातले आहे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत चालला आहे, अनेक लोकांनी या आजाराने भयभीत झाले आशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या लोकांना आधार देऊन कोरोना विषाणूजन्य परिस्थितीचा योग्य रितीने मुकाबला केला पाहिजे, या विषयावर सविस्तरपणे चर्चा श्री रामदास धुमाळ यांनी केले.

पहिल्या दिवशी तालुका कक्षातील कर्मचाऱ्यांनी या गूगल मीट आयोजन तंत्रिका मार्गदर्शन आणि प्रशिक्षण जिल्हा व्यवस्थापक डी. एच. देशपांडे आणि तालुका व्यवस्थापक प्रा. इरवंत सुर्यकार यांनी सर्व कॅडर यांना अभियानाने करीत असलेल्या उपाययोजना या विषयाची सविस्तर माहिती गुगल मीटच्या पीपीटीच्या माध्यमातून सांगितले. 

तालुक्यात महिलांनी कापडी मास्क व सॅनिटायझर यांचा नियमितपणे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. ता. १० व ता. ११ जून रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, द्वारकादास राठोड यांनी या आर्थिक वर्षात उद्धिष्ट पूर्तता कश्या प्रकारे पूर्ण करून अभियान अधिक गतिमान झाले पाहिजे कोरोना आजाराबाबत महिलांनी अधिक जागृत राहण्याचे आवाहन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT