lungs 
नांदेड

काळजी घ्या ! महामारीत सर्वात जास्त त्रास मलाच; आपल्या फुफ्फुसाचे भावनिक मनोगत

आजच्या कोरोना महामारीत व प्रदूषित वातावरणाचा सर्वात जास्त त्रास मलाच सहन करावा लागतो. माझा सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. शरीरातील पेशींना आवश्यक असा प्राणवायू हवेतून मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात आम्ही जोडीने राहतो. सर्व काम जोडीनेच करतो. माझ्या उजव्या भागात तीन कप्पे असतात तर डाव्या भागात दोनच असतात आम्ही आतून स्पंजाप्रमाणे असतो.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आजच्या कोरोना महामारीत व प्रदूषित वातावरणाचा सर्वात जास्त त्रास मलाच सहन करावा लागतो. माझा सतत बाहेरील हवेशी संपर्क येत असतो. शरीरातील पेशींना आवश्यक असा प्राणवायू हवेतून मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात आम्ही जोडीने राहतो. सर्व काम जोडीनेच करतो. माझ्या उजव्या भागात तीन कप्पे असतात तर डाव्या भागात दोनच असतात आम्ही आतून स्पंजाप्रमाणे असतो.

तुम्ही जन्माला येतात तेव्हा गुलाबी असतो. पण नंतर तुम्ही हवेतून इतके घाणेरडे पदार्थ श्वासावाटे घेता की आमचा रंग काळपट करडा होत जातो.

माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काही वेळा तरी माझ्या सर्वांगाला काम दिले पाहिजे. तुम्हाला धाप लागेल असा व्यायाम केला पाहिजे. भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम या प्राणायामाचाही माझे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपयोग होतो.

हेही वाचा - विनाकारण फिरत असाल तर वाहन होईल जप्त

माझी लवचिकता वाढते धूम्रपान व प्रदूषित हवा हे माझे सर्वात मोठे शत्रू आहेत. निसर्गाने तुमच्या श्वसननलिकेची योजना हवा आत घेण्यासाठी केलेली आहे. बिडी, सिगारेटचा धुर घेण्यासाठी नाही याची आठवण तुम्ही ठेवायला हवी. तुमच्या प्रदूषित हवेला व कोरोनाच्या विषाणूला तोंड देता येईल असे पुरेशी उपाय माझ्याकडे नाहीत. यामुळे खोकला, दमा, न्युमोनिया, क्षयरोग व कॅन्सर अशा मला होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. हवेतील प्रदूषण या प्रमाणेच तुमच्या प्रदूषणाचाही दुष्परिणाम माझ्यावर होतो.

या कोरोना महामारीत माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने सकाळी योग व प्राणायाम करत जा. घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावूनच जा. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. मला तेथेच जास्त धोका आहे. हात जोडून विनंती करतो की तुम्ही घरीच सुरक्षित आहात बाहेर नाही. ऐकाल ना...?

तुमच्यासाठी व माझ्यासाठी..!

हा संदेश सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT