ashok chavan ashok chavan
नांदेड

नांदेड : शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे सुशोभीकरण

मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश ; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाविकास आघाडी सरकारच्या(mahavikas aghadi government) माध्यमातून पालकमंत्री अशोक चव्हाण(minister ashok chavan) यांनी विकास सुरु केला असून वर्षभरात अनेक विकासाचे काम मार्गी लावल्यानंतर आता येथील विष्णुपुरी भागातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील वातानुकुलीत यंत्रणा, सीसीटीव्ही, लिफ्ट, बागबगीच्या व रॅम्प आदी कामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. कोरोनाचा सामना(corona) करतानाच जिल्ह्याच्या विकासाची गती कायम असल्याने नांदेड जिल्हा(nanded district) विकासात नंबर एक ठरेल असा विश्वास जिल्हावासियांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते-पूल आदी पायाभूत सोयी सुविधेच्या कामासाठी मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने मार्गी लागली मात्र गत भाजप सरकारच्या कार्यकाळात विकासाची गती शून्यावर आली. अनेक कामे लालफीतीत अडकली. विकास कामाबाबत तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही हालचाल झाली नव्हती. तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ही जबाबदारी आली. त्यांनी वर्षभरात पाच वर्षांच्या विकासाचा अनुशेष भरून काढत अतिशय वेगाने जिल्ह्यातील विकास कामे सुरु केले.

विष्णुपुरी भागातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील वातानुकुलीत यंत्रणा, सीसीटीव्ही, लिफ्ट, बागबगीच्या तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प आदी कामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या कामातून रूग्णालयाच्या सुशोभीकरण आणि सौंदरीकरणाचे काम पूर्ण होऊन रुग्णालयाचे रुपडे बदलणार आहे. जिल्ह्याच्या विकासाची गती कायम असल्याने नांदेड जिल्हा विकासात अव्वल ठरेल असा विश्वास जिल्हावासियांनी व्यक्त केला असून अशोक चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT