MOOK.jpeg 
नांदेड

ऑनलाईन इंग्रजी प्रशिक्षणात ‘या’ केंद्राची बाजी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन तसेच अनेक समस्यांचा सामना करीत असूनही वाजेगाव केंद्रीतील शिक्षकांनी रेशन वाटप, गाव सर्वेक्षण, बाहेरगावाहून आलेल्या लोकांचे विलगीकरण आदी नेमून दिलेली कामे पार पाडत इंग्रजी विषयाचा राज्यस्तरीय ऑनलॉईन मूक (MOOC) अभ्यासक्रम उत्कृष्ट रीतीने पूर्ण करून सुवर्ण, रजत व कास्य प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहेत.

डिसेंबर २०१९ पासून झाली सुरवात
या ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुरुवात डिसेंबर २०१९ पासून सुरू झाली. तर ता. १० मे ही अंतिम मुदत होती. वाजेगाव केंद्रातील सर्व शाळेतील एकूण १९ इंग्रजी विषय शिक्षकांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. सर्वच्या सर्व १९ शिक्षकांनी विहित कालावधीत विशेष प्रावीण्यासह हा अभ्यासक्रम पूर्ण करून घवघवीत यश संपादित केले आहे. वाजेगाव केंद्राबरोबरच नांदेड तालुक्यातील चौफाळा व वजिराबाद केंद्रातील अनुक्रमे १९ व २५ शिक्षकांनीही हा अभ्यासक्रम पूर्ण करून यश मिळविले आहे.

राज्यातील पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम
या प्रशिक्षणात ऑनलाईन वेबिनार, प्रत्यक्ष बैठका तसेच व्हॉटसॲप समूहाच्या माध्यमातून वेळोवेळी शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, तसेच वाजेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख व्यंकट गंदपवाड व केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले, असे मत तेजस तथा मूक समन्वयक रूपाली गोजवडकर यांनी व्यक्त केले.
मूक हा (MOOC- Massive Open Online Course) प्रादेशिक विद्याप्राधिकरण आंग्ल भाषा तत्वज्ञ औरंगाबाद यांनी सुरू केलेला राज्यातील पहिला इंग्रजी विषयक ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात राज्यपातळीवर समन्वयक नेमून जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत बैठका व वेबिनारद्वारे समुपदेशनातून हा अभ्यासक्रम पोहंचविला जातो.

यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन
मूक ही संकल्पना डॉ. सुभाष कांबळे (संचालक, विद्या प्राधिकरण), डॉ. उज्ज्वल करवंदे, डॉ प्रमोद कुमावत, प्रा रणजित देशमुख व प्रा. निसार शेख यांच्या तंत्रस्नेही टीमने विकसित केली आहे. वाजेगाव, चौफाळा व वजिराबाद या नांदेड तालुक्यातील तीन केंद्रासाठी रूपाली गोजवडकर यांनी समन्वयक म्हणुन उत्कृष्ट रीतीने जबाबदारी पार पाडली. या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी रुस्तूम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, डॉ. राजेश पावडे, सुरेश पांचाळ (ESA DIECPD) केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, निरंजन भारती, माधव दुधमल, केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाडे यांनी समन्वयक रूपाली गोजवडकर व तीनही केंद्रातील यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT