नांदेड : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा आज पोचलेली आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले असल्याने मुले शिक्षण घेत आहेत. परंतु, ज्यांची ऐपतच नाही किंवा शिकून काय करायचे असे म्हणणाऱ्यांचे काय, हा प्रश्न आजही सतावत आहे.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (सोमवार, ता. १५ जून) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासराळी येथे गंगाधर लंके व किशोर चौधरी हे घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करत होते. दरम्यान भाग्यश्री सिदमुलवाड ही इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली मुलगी त्यांच्याजवळ गेली. म्हणाली की, सर माझी चुलत बहीण अकरा वर्षांची आहे. पण, ती शाळेत कधीही गेली नाही. कृपया तीला शाळेत प्रवेश देता का?"
भाग्यश्रीने जोपासली सामाजिक बांधिलकी
भाग्यश्रीने असे म्हणताच गंगाधर लंके व किशोर चौधरी दोघांनीही लगेच तत्परता दाखविली. त्यांनी लगेच यमुना सिदमलवाडचा प्रवेश अर्ज भरून घेऊन लागलीच पुस्तकेही दिली. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासराळी (ता बिलोली) येथे सहशिक्षक गंगाधर लंके व किशोर चौधरी हे घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करत असताना एका शालेय विद्यार्थिनीच्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव त्यांना आला.
शिक्षकही गेले भारावून
सध्या शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत, मात्र आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, किमान नवी पाठ्यपुस्तके त्यांच्या हाती पडली तर त्यांचा अभ्यास सुरू राहील या भूमिकेतून, गंगाधर लंके व किशोर चौधरी दोघे शिक्षक गावात घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके वाटप करीत असताना भाग्यश्री सिदमुलवाड त्यांना भेटली. आणि माझी चुलत बहिण अकरा वर्षांची आहे, कृपया तिला शाळेत प्रवेश देता का?" या शिक्षकांनी आनंदाने तिचं स्वागत केलं. यमुना या शाळाबाह्य विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश दिल्याचा आनंद, भाग्यश्रीबद्दल अभिमान या शिक्षकांनी व्यक्त केला.
हे देखील वाचाच - सर्पदंश होऊ नये म्हणून ‘ही’ घ्या काळजी -
वाजेगाव शैक्षणिक बिटात
पुस्तकांचे केले वाटप
वाजेगाव शैक्षणिक सत्राच्या प्रारंभाच्या दिवशीच शिक्षकांनी मुलांना घरोघरी जावून पुस्तके दिली. प्रतिवर्षी शाळारंभ हा उपक्रम राबवून नव्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जोमाने स्वागत करण्यात येते. शिक्षक विद्यार्थी पालक हे एकत्रित येऊन शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहाने सुरुवात केला जातो. मात्र कोरोना संकटामुळे हे चिमुकले विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. परंतु त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाकडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचवावी त्या भूमिकेतून वाजेगाव शिक्षण विभागातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाच्या बाबतीतील सर्व बाबींची दक्षता घेऊन घरपोच पाठ्यपुस्तके देण्यात आली.
येथे क्लिक कराच - सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकास जन्मठेप
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद
केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतली. कोरोना बाबतीत सर्व दक्षता घेण्याची सूचना दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पाठ्यपुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तके मुलांच्या हातात दिली. शाळा नसली तरी नवीकोरी पुस्तके पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.