नांदेड : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत (Primminister crop insurance) खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३९ हजार २६९ शेतकर्यांना २१ कोटी ९७ लाख५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर (crop insurance sanction) झाला आहे. यात सर्वाधीक १६ कोटी ३५ लाखांचा विमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्याला मिळाला आहे. तर माहूर तसेच लोहा तालुका निरंक आहे. यामुळे करोडोचा विमा हप्ता भरलेल्या शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. (Bhokar taluka has maximum insurance of Rs 16 crore; loha, Mahur Zero: Dissatisfaction among insured farmers)
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकर्यांनी ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद व मूग या पिकासाठी एकूण नऊ लाख ५५ हजार आठशे ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे विमा भरला होता. पिके उभे असतांना यंदा अतिवृष्टी झाली होती. यात अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केलेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकर्यांना एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. यानंतर शिल्लक शेतकर्यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. कंपनीकडून नुकताच विमा मंजूरीबाबत तपशील जाहीर केला आहे.
हेही वाचा - हिंगोलीत ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी; काय आहेत वाचा सविस्तर
यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल अशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक प्रयोगाच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकर्यांना २१ कोटी ९७ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाल्याचे कळविले. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघातील भोकर तालुक्याला सर्वाधीक १६ कोटी ३५ लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. तर माहूर तसेच लोहा तालुक्यातील शेतकर्यांना मात्र भरपाई मिळाली नाही.
तालुकानिहाय मंजूर पिकविमा
(कंसात शेतकरी संख्या)
अर्धापूर- ४३.७८ लाख (१४७), भोकर- १६.३५ कोटी (१९,८३७), देगलूर- १.२८ कोटी (२,६०६), धर्माबाद- ८५ हजार (४३), हदगाव- ११.०८ लाख (४३२), हिमायतनगर- ८५.५९ लाख (३,४६४), कंधार- एक कोटी (४,३९०), किनवट- ५७.७९ लाख (२,१७४), लोहा- शुन्य, माहूर- शुन्य, मुदखेड- ४.३३ लाख (१००), मुखेड- १.७५ लाख (८६), नायगाव- १.१२ कोटी (२,९८९), नांदेड- ८.०८ लाख (३३१), उमरी- ३९.२८ लाख (२,५५३), बिलोली- ७.१० लाख (११७).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.